हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

भर शेतात बुटाने मारहाण, आता ‘बलात्काराच्या खोट्या गुन्ह्याची’ धमकी! वाशिम कृषी विभागावर गंभीर आरोप

Follow Us:
वाशिम कृषी विभाग शेतकरी मारहाण प्रकरणात बलात्काराच्या खोट्या गुन्ह्याची धमकी

वाशिम| १६ जानेवारी २०२६

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील गोगरी येथे शेतकरी मारहाण प्रकरण आता अत्यंत गंभीर वळणावर पोहोचले आहे. वाशिम कृषी विभाग अंतर्गत तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्याला भर शेतात बुटाने मारहाण केल्यानंतर, आता बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली जात असल्याचा खळबळजनक आरोप समोर आला आहे. या घटनेमुळे Washim News मध्ये मोठी खळबळ उडाली असून जिल्हाभर संताप व्यक्त केला जात आहे.गोगरी येथील शेतकरी ऋषिकेश पवार हा फळबाग अनुदानाबाबत माहिती घेण्यासाठी १३ जानेवारी रोजी तालुका कृषी कार्यालयात गेला होता. यावेळी तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यांनी अधिकाराचा माज दाखवत भर शेतात पायातील बूट काढून मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडीओ व फोटो समोर आल्यानंतरही कारवाई न झाल्याने संताप वाढला आहे.

या मारहाण प्रकरणानंतर आता आणखी गंभीर खुलासा समोर आला आहे. स्वतःची चूक झाकण्यासाठी कृषी विभागातील काही महिला कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ऋषिकेश पवार याला ‘विनयभंग व बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी’ दिली जात असल्याचे खुद्द पीडित शेतकऱ्याने सांगितले.

१५ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात झालेल्या आंदोलनात ऋषिकेश पवार म्हणाला, “मला बुटाने मारहाण झाली ते पुरेसे नव्हते का? आता माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात आहे. मी न्याय कोणाकडे मागायचा?”

या प्रकारानंतर शेतकरी नेते दामू अण्णा इंगोले यांनी शेकडो शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत आक्रमक भूमिका घेतली. “शेतकऱ्याच्या अस्मितेशी खेळ करणाऱ्या मग्रूर अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करा, अन्यथा वाशिमचा बळीराजा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.

हे पण वाचा..

वाशिम महसूल विभागात खळबळ! 10 हजारांची लाच घेताना तलाठी ACBच्या जाळ्यात

दरम्यान, पालकमंत्री दत्तात्रय (मामा) भरणे यांच्या भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांच्या बाजूने बोलणारे मंत्री या गंभीर प्रकरणात मौन बाळगणार की कठोर कारवाई करणार, असा सवाल उपस्थित होत आहे.


👉 KattaNews.in वर तुमचे मत नोंदवा

शेतकऱ्याला मारहाण करून खोट्या गुन्ह्यांची धमकी देणे योग्य आहे का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की कळवा.


हे पण वाचा..

नारायणराव आरु पाटील

नारायणराव आरू पाटील हे Katta News चे अधिकृत वाशिम जिल्हा प्रतिनिधी आहेत.ते मागील 10 वर्षांपासून स्थानिक व राज्य पत्रकारितेत कार्यरत असून वाशिम जिल्ह्यातील प्रशासन व सामाजिक विषयांवर वार्तांकन करतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

जळगाव जामोद विद्यार्थिनी मृत्यू घटनेनंतर रामनगर परिसरात शोककळा

दहावीच्या वर्गातून आयुष्याच्या वाटेवर जाण्याआधीच जयश्रीचा प्रवास थांबला; अवघ्या १५व्या वर्षी मृत्यू, ‘नेमकं काय घडलं?’

देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयाची इमारत, प्रिया कदम मृत्यू प्रकरण

पोलीस भरतीची तयारी, भविष्यासाठी स्वप्नं…गारखेड्यातील २० वर्षीय प्रिया कदम यांचा देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयात मृत्यू; नेमकं कारण काय?

वाकोडी (मलकापूर) येथे भरदुपारी पोत हिसकावण्याचा प्रयत्न झालेले काजळे यांचे घर

भरदुपारी चाकूचा धाक दाखवून महिलेची पोत हिसकावण्याचा प्रयत्न; आरडाओरड होताच तरुण धावले अन् चोरट्याने पळ काढला!

बुलढाणा वन सर्वेक्षक लाच प्रकरणात एसीबीची कारवाई

लाकूड वाहतुकीच्या परवानगीसाठी २ हजारांची लाच; बुलढाण्यात वन सर्वेक्षकावर गुन्हा दाखल

बेपत्ता महिला शेगाव - पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

शेगाव: ब्युटी पार्लरमध्ये जाते सांगून घराबाहेर पडलेली महिला बेपत्ता, पतीची पोलिसांत तक्रार

जानेफळ पोलिसांची दारू जप्ती कारवाई लावणा बसथांबा

लावणा बसथांब्यावर दारूचा साठा जप्त; जानेफळ पोलिसांची धडक कारवाई

Leave a Comment