रिसोड (वाशीम) | २६ मार्च २०२६
उसने दिलेले पैसे मागितल्यामुळे संतापलेल्या आरोपीने महिलेवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या Washim Crime News प्रकरणात न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
माहितीनुसार, पीडित महिलेने आरोपी सीताराम कचरा झिंगरे (वय 73, रा. कवठा, ता. रिसोड) याला विश्वासाने 50 हजार रुपये उसने दिले होते. पैसे परत मागितल्यावर आरोपी संतापला आणि त्याने महिलेवर जबरदस्तीने अत्याचार केला.
यानंतर आरोपीने दगड व लोखंडी पाईपने तिच्या डोक्यावर वार करून तिची हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत दगड व गवताखाली लपवून ठेवले होते.
या प्रकरणी 19 ऑगस्ट 2024 रोजी रिसोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. पोलीस उपनिरीक्षक अशोक गिते यांनी तपास करून सर्व पुरावे न्यायालयात सादर केले. एकूण 10 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली.
न्यायालयाचा निकाल:
खून: आजीवन कारावास + 5000 रुपये दंड
बलात्कार: 10 वर्षे कारावास + 5000 रुपये दंड
पुरावा नष्ट करणे: 7 वर्षे कारावास + 5000 रुपये दंड
सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. सुचीता कुलकर्णी यांनी युक्तिवाद केला. पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांनी साक्षीदारांना मार्गदर्शन केले.
हे पण वाचा..
रिसोडमध्ये धक्कादायक घटना! १७ वर्षीय युवतीची आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट
गॅस टंचाईमुळे मोठा निर्णय! आता पेट्रोल पंपांवर ‘केरोसीन’ मिळणार; विधानसभेत छगन भुजबळांची घोषणा










