वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील
washim : केंद्र सरकार पुरस्कृत व राज्य सरकारच्या संयुक्त योजनेअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या ‘प्रधानमंत्री फसल विमा योजना’ 2024 खरीप हंगामा मधील माझी पॉलिसी माझ्या हातात हा उपक्रम मंगरुळपिर तालुक्यात राबविण्यात येत आहे. पिक विमा योजना खरीप 2024 साठी वाशिम जिल्ह्यात भारतीय कृषी विमा कंपनी (AIC) कार्यरत असून जिल्हा व्यवस्थापक श्री सोमेश देशमुख shri somesh deshmukh यांच्या मार्गदर्शनाखाली मंगरुळपिर mangalurpir तालुक्यात माझी पॉलिसी माझ्या हातात हा उपक्रम राबविण्यात येत आहे ,
तरी या उपक्रमा अंतर्गत तालुका प्रतिनिधी अनंता अंभोरे, पवन जायभाये, चंद्रशेखर राठोड, निशांत मोवळे, शंकर कांबळे यांच्याद्वारे गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना पॉलिसी वाटप करण्यात येत आहे, तसेच सोबत फसल विमा पाठशाळा या कार्यशाळेचे आयोजन करून शेतकऱ्यांना पीक विमा योजनेबद्दल मार्गदर्शन करण्यात येत आहे, शेतकऱ्यांना उद्भवणारे प्रश्न समजून घेऊन त्यांचे निराकरण करण्यात येत आहे. मंगरुळपिर mangalurpir तालुक्यात माझी पॉलिसी माझ्या हातात या कार्यक्रमाला शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त सहभाग मिळत आहे.