
लाडकी बहीण नंतर आता सरकारची लाडकी मोलकरीण योजना ! राज्य सरकारने अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची घोषणा केली. या योजनेच्या घोषणेनंतर राज्यभरातून महिलांनी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी गर्दी केली.
मध्य प्रदेशच्या लाडली बहना योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू करण्यात आली आहे. यानंतर आता असंघटित क्षेत्रातिल मोलकरणींसाठीदेखील सरकार लवकरच एक गृहोपयोगी साहित्य वाटपासंदर्भातील योजनेवर काम करत आहे. राज्यात तब्बल १० ते १२ लाख घरगुती कामगार- मोलकरणींची molkarin संख्या असल्याची माहिती सरकारच्याच वतीने जाहीर करण्यात आले आहे.