वाशिम जिल्हा प्रतिनिधी/नारायणराव आरु पाटील
मालेगाव तालुक्यातील नागरतास येथे दि. २१ जुलै रोजी त्रीरत्न बौद्ध विहार जागृती मैदान नागरतास येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गुरू पौर्णिमा या दिवसा पासुन वर्षावासाला सुरवात करण्यात आली होती. बौद्धाचार्य जे. एस. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्रीरत्न बौद्ध विहार जागृती मैदान नागरतास येथे बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचे पठन करण्याची सुरवात केली. या वर्षावासाच्या तिन महिन्या मध्ये दररोज संध्याकाळी सात वाजता मधुकर ताजने हे या ग्रंथाचे पठन करत होते.७ ऑक्टोंबर रोजी सामनेर ला सुरुवात झाली १६ ऑक्टोंबर सामनेर समाप्त झाले ,१० दिवसाचे सामनेर होते , तर दि. १७ ऑक्टोबर गुरुवार रोजी त्रीरत्न बौद्ध विहार नागरतास येथे बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचे पठन करत होते.
तर दि. १७ ऑक्टोबर गुरुवार रोजी त्रिरत्न बौद्ध विहार,जागृती मैदान, नागरतास येथे बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथ पठणाची समारोप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच महाराष्ट्रातील प्रसिद्धी गायिका भाग्यश्री इंगळे होत्या.सर्व प्रथम तथागत गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करून त्रिशरण पंचशील घेण्यात आले. भिम गीताचा कार्यक्रम या वेळी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या साठी नागरतास येथे बौद्ध उपासक, उपासिका यांनी आप आपल्या परीने दान दिले. या मधुन भव्य महाप्रसाद म्हणुन पुरी, खिर, भाजी, मसाले भात करण्यात आले होते. या कर्यक्रमा साठी नागरतास येथे भिम ज्वाला ग्रुप, रमाई महिला गट,सर्व बौद्ध उपासक, उपासिका यांनी परिश्रम घेतले.