
नारायणराव आरू पाटील, वाशिम/प्रतिनिधी
(Risod) : संपूर्ण महाराष्ट्रात निवडणुका लागायची घाई गडबड पाहता निवडणुका केव्हाही लागू शकतात याबाबत कर्तव्यात दक्ष असलेल्या रिसोड विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली देवकर यांनी आज दिनांक १०/९/२०२४ ला रिसोड येथील तहसील कार्यालयात ईव्हीएम EVM व व्ही व्ही पॅड यांचे मार्गदर्शन मास्टर ट्रेनर यांना दिले.
यामध्ये जवळपास ८० मास्टर ट्रेनर उपविभागीय दंडाधिकारी तथा रिसोड विधानसभा निवडणुक अधिकारी वैशाली देवकर यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी उपस्थित होते. ह्या दोन्ही मशीन कशा हाताळायच्या याबाबत संपूर्ण विश्लेषण करून उपविभागीय दंडाधिकारी यांनी दोन्ही मशीनचे प्रात्यक्षिक करून मास्टर ट्रेनर यांना मशीन कशी हाताळायची,
काय करावे, काय करू नये याचे संपूर्ण मार्गदर्शन रिसोड तहसील कार्यालयात आज करण्यात आले त्यामुळे निवडणुकीत कोणताही अडथळा निर्माण होणार नाही.चुका होणार नाहीत याबाबत आपण कसे दक्ष रहाल याबाबत विश्लेषण करून सर्व माहिती दिली त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत मास्टर ट्रेनर यांना अडचणी येणार नाहीत असे या मार्गदर्शनातून दिसते.