
वाशिम जिल्हा प्रतिनिधी/नारायणराव आरु पाटील
वाशिम washim जिल्ह्यातील रिठद गाव रिसोड तालुक्यात सर्वात मोठे असून येथे महसूली क्षेत्र सुद्धा जास्त असून शेतकऱ्यांची संख्या सुद्धा जास्त असल्याने अर्थातच खातेदार जास्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची कोणती ना कोणती कामे तलाठ्याकडे पडतच असतात. दरम्यान रिठद गावातील शेतकरी सुभाष प्रल्हाद बोरकर सुशिक्षित बेरोजगारांने शेतीच्या भरोशावर शेतकऱ्याने आर्थिक विकास महामंडळाकडून म्हसी घेऊन या दुधाच्या व्यवसायासाठी कर्ज घेतले होते त्या कर्जाचा बोजा सातबारावर चढवल्या गेला होता. तो उतरवण्यासाठी सतत तहसील मध्ये एक महिना लोटला व त्यानंतर आज दहा ते बारा दिवस झाले तलाठी कार्यालयाकडे चकरा मारत आहेत.
आज दिनांक २१ आक्टो. रोजी सकाळी १०,११,१२, वा. शेतकऱ्याने तलाठी कार्यालय भोवताल चक्रा मारल्या. परंतु तलाठी कार्यालय बंदच होते.१२.४२ मी. तलाठी कार्यालय स्थानिक माणसाच्या हाताने उघडले. सुशिक्षित बेरोजगारांने बोजा कमी करण्यासंदर्भात तलाठी संत्रे यांच्या व्हाट्सअप वर या बाबीची कल्पना दिली परंतु त्यांना निवडणुकीच्या कारणास्तव कोणताही वेळ नसल्याचे त्या सांगतात. ही कामे होण्यासाठी शिवसेनेचे तालुकाप्रमुख नारायणराव यांनी तलाठी संत्रे यांना फोन केला असता आपण फोन करणारे कोण ? आपलं काही काम नाही ! ज्यांचं काम आहे त्यांनी फोन करावा. असे उद्धटपणे बोलणार्या तलाठी संत्रे यांच्यावर कार्यवाही करावी.
याबाबत लेखी तक्रार करणार उद्या असल्याचे नारायण आरू यांनी सांगितले. इलेक्शनच्या नावावर कायम दांड्या मारणे हाच धंदा तलाठी संत्रे यांनी धरला असून या अगोदरही जेव्हापासून रिठद मंडळात रुजू झाल्या तेव्हापासून कधी येणे, कधीही जाणे.असे चालू राहिले तर शेतकऱ्यांच्या हिताची कामे कशी होणार ? ही गंभीर बाब लक्षात घेता तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी संबंधितांना कारणे नोटीस देऊन कार्यवाही करावी. व मंडळ अधिकारी पटवे यांना उद्धटपणे बोलण्याबाबत कल्पना सुद्धा दिली व अशा उद्धट तलाठ्याची रिठद येथे शेतकऱ्यांना कोणतेच गरज नाही त्यामुळे यांचे तात्काळ बदली करण्यात यावी. किंवा कायम अशा तलाठ्याची ड्युटी लावावी. त्यामुळे इलेक्शन दरम्यान कोणतेच काम करायचे नाही असे कदाचित तलाठी संत्रे यांनी ठरवले असावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.