खडकी ढंगारे गावाजवळील लहान पूलाची उंची वाढवा – मधुकर ढंगारे

 

नारायणराव आरु पाटील/प्रतिनिधी 

 

खडकी ढंगारे रिसोड तालुक्यातील रिसोड (risod) तालुक्याच्या हद्दीतील शेवटच्या टोकाचे गाव, गावाची लोकसंख्या कमी असल्याने गावाकडे लोकप्रतिनिधीचे पूलाच्या उंची वाढवण्याकडे कायम दुर्लक्ष होत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत हे दिवस दरवर्षी पण येतात परंतु बोराळा ते रिठद ही आढळनदी ये-जा करण्याच्या रस्त्यामध्ये असल्याने गावातून बाहेरगावी गेले आणी नदीला पाणी येते पूर आला की रात्र-रात्र गावात जाता येत नाही .

 

 

त्यामुळे नदीजवळच असलेल्या पुलाचे काठावर पूराचे पाणी उतरण्याची वाट दि.५सष्टे.२०२४ला सायं ५वा.पासून वाट पाहावी लागली. परंतु नदीचे पाणी उतरत नसल्याने शेजारी असलेल्या शिरसाळा गावात कंटाळून मुक्काम करावा लागला .परंतु हे नेहमीच झाले असल्याने सर्व गावकरी मंडळी कंटाळली असून खडकी ढंगारे गावाजवळ असलेल्या पुलाच्या कमी उंचीचा गावकऱ्यांना नेहमीच त्रास होतो.

 

 

करिता या पूलाची उंची वाढवावी किंवा नवीन पूल करण्यात यावा त्यामुळे या समस्येतून कायमची सुटका होईल असे मधुकर ढंगारे व गावकरी मंडळी यांना वाटते. तरी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने या बाबीची गंभीर दखल घ्यावी असे माजी उपसरपंच मधुकर ढंगारे यांनी बोलतांना सांगितले.