washim : विदर्भातील पहीले ओबीसी आरक्षण बचाव वाचवण्यासाठी उपोषण !

washim

 

वाशिम जिल्हा प्रतिनीधी नारायणराव आरु पाटील

 

washim : संपूर्ण महाराष्ट्ररात मागील दोन वर्षापासून आरक्षणासाठी उपोषणाच्या विषयाची चर्चा होत आहे.मराठवाडा हा उपोषणाचा केंद्र‌बिंदू आहे.ओबीसीचे आरक्षण वाचवण्यासाठी जालना jalna जिल्हात वडीगोद्री wadigodri येथे प्रा लक्ष्मण हाके,नवनाथ वाघमारे, ॲड मंगेश ससाणे यानी उपोषण केले.आज घडीला संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे लोन पसरले.त्याच अनुषगाने विदर्भात आता पर्यन्त ओबीसीसांठी कोणत्याही संघटनेने उपोषन केले नव्हते.परंतु वाशिम जिल्हातील रिसोड तालुक्यातील पिंपरखेड फाट्यावर अजयसिंह राजुरकर,दिपक बुधवत,ज्ञानेश्र्वर आघाव,दीपक तिरके, अजिंक्य मेडशिकर ईत्यादी ओबीसी बांधवांनी प्रा लक्ष्मण हाके यांच्या समर्थनार्थ २४ तारखेपासुन आमरण उपोषण सुरु केले.आणि हे उपोषणकर्ते हे ओबीसी प्रवर्गातील वंजारी,माळी,धनकर,बंजारी अशा विवीध जातीचे आहेत.विदर्भातील हे पहीले ओबीसी आरक्षण बचाव वाचवण्यासाठी उपोषण आहे.यावरून हे उपोषण किती व्यापक स्वरुपाचे आहे हे सिद्ध होते.

 

 

 

आज संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी,बहुजन वंचित समाज मोठ्या प्रमाणात जागरूक झालेला आहे.कोणत्याही परिस्थीतीत ‘ओबीसी’ प्रवर्गावर कोणताही अन्याय सहन केला जाणार नाही.ओबीसी प्रवर्गातील त्यांच्या हक्काचं कोणी मागत असेल तर ओबीसी वर्ग मोठा रस्ता संख्येने रस्त्यावर उतरतील आणि आपली ताकद दाखवतील. मागील काही वर्षापासून या महाराष्ट्रात मनोज जरांगे यांनी उपोषण करून शासणावर दबाव आनत आम्हाला ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावे या साठी ताकद लावली होती.व शासन पण कुठं तरी त्यांना झुकत माप देत आहे.आता प्रा लक्ष्मण हाके यांच्या उपोषणामुळे त्यांना काही प्रमानात का होईना माघार घ्यावी लागली.रिसोड तालुक्यातील ओबीसी आरक्षण बचाव आमरण उपोषण हे विदर्भातील पाहिले व एकमेव उपोषण असल्यामुळे परिसरातील ओबीसी बांधवांनी उपोषण स्थळी मोठ्या प्रमाणात भेट देत उपोषण कर्त्याचे मनोबल वाढविले.