कोणत्याही योजनेचे पैसे कर्ज खात्यात वळते करू नका असा राम इढोळे यांचा इशारा…

योजनेचे

 

नारायण आरु पाटील / प्रतिनिधी 

 

कोणत्याही योजनेचे पैसे कर्ज खात्यात वळते करू नका असा राम इढोळे यांचा इशारा…रिठद rithad ता. १२ शेतकरी पुत्र राम इढोळे ram idole यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा रिठद rithad चे शाखा प्रबंधक विशाल अवचार यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कोणत्याही योजनेचे पैसे जसे कि पी.एम.किसान सन्मान निधी,नमो शेतकरी सन्मान निधी,अथवा अतिवृष्टीचे व इतरही कोणतेही शासनाकडून मिळणारे अनुदानाचे व लाभाचे पैसे कोणत्याही कर्ज खात्यात वळते करू नये.

 

 

आणि काही खाते आपल्या बँकेने होल्ड केले आहेत ते सुद्धा होल्ड करू नये. केले असल्यास होल्ड काढावे. याबाबत शेतकऱ्यांच्या तोंडी तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. असे शाखा प्रबंधक यांना निवेदन देताना सांगितले.करिता याबाबतचे निवेदन शेतकरी पुत्र ‘राम इढोळे’ यांनी आज दिनांक १२/८/२०२४ ला रिठद शाखा प्रबंधक विशाल अवचार यांना दिले आहेत.