Buldhana : जप्त करण्यात आलेला रेतीसाठा चोरीला,अज्ञात व्यक्तिवर गुन्हा दाखल.

 

 

सलमान नसीम अत्तार, चांडोळ/प्रतिनिधी 

 

चांडोळ: बुलढाणा (Buldhana) तहसिलदार यांच्या पत्रानुसार चांडोळचे तलाठी अभिजित पाटील यांनी ९/९/२०२४ वार सोमवारी धाड पोलीस स्टेशला दिलेल्या फिर्यादीनुसार मौजे चांडोळ येथील बेलुरा रस्तेला पूर्वेला वडाच्या झाडाजवळ हनुमान मंदिराला लागुन २० ते २५ रेतीसाठा अंदाजे किंमत २० ते २२ हजार रुपये हा रेतीसाठा दि.६/६/२०२४ ला अज्ञात व्यक्तीने साठवलेला होता. तो पंचासमक्ष जप्त करण्यात आला होता.

 

 

सदर अवैध रेतीसाठा जप्त करुन चांडोळ भाग-२चे शासकीय कोतवाल सुरेश जाधव यांना त्याच दिवशी ताबा पावत्या देण्यात आल्या होत्या. त्याच दिवशी गट क्र.४२७ दुसरा रेतीसाठा अंदाजे २० ते २५ ब्रास रेतीसाठा जप्त करण्यात आला होता.सदर जप्त करण्यात आलेला रेतीसाठा लिलावाध्दारे चांडोळ येथील राजेंद्र फकिरसिंग धनावत यांनी शासकीय रक्कम भरुन नियमानुसार विकत घेतला होता.बेलेरा रस्तावरील वडाच्या झाडाजवळ हनुमान मंदिरा जवळील रेतीसाठयाचे लीलाव न झाल्याने त्याच ठिकाणी पडलेला होता.

 

 

चांडोळचे तलाठी अभिजित पाटील व कोतवाल सुरेश जाधव दि.७/९/२०२४ रोजी रेतीसाठयाची पाहणी करण्यासाठी गेले असता रेतीसाठा आढळुन आले नाही. अज्ञात व्यक्तीने रेतीसाठा चोरुन नेल्याचे निदर्शनास आले.सदर रेतीसाठा अज्ञात व्यक्तिने चोरुन नेल्याची माहिती तलाठी अभिजित पाटील यांनी बुलढाणा तहसीलदार यांना कळविण्यात आली. तहसीलदार यांनी तलाठी कार्यालय चांडोळ यांना पत्र क्र कावि/ प्रस्तु -1/1048/2024 06/09/2024 नुसार अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिला.

 

 

तलाठी अभिजित पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात व्यक्ति विरुद्ध अप नं /२५८/२४ कलम ३०३(२)भारतीय न्याय संहिता दि.९/९/२०२४ वार सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास धाड पोलीस स्टेशचे ठाणेदार नरेंद्र पेंदोर यांच्या मार्गदर्शनाखाली चांडोळ बीट जमदार संदिप कायंदे,पो.का.भास्कर लवंगे करीत आहे.