Risod Aagar : रिसोड आगार चे व्यवस्थापक दादाराव दराडे यांची विभागीय वाहतूक अधिकारी यवतमाळ म्हणून पदोन्नती करण्यात आली.

 

 

नारायण आरु पाटील, वाशिम/ प्रतिनिधी

 

रिसोड आगाराचे (risod Aagar) आगार व्यवस्थापक श्री दा का दराडे यांची राप रिसोड आ व्यवस्थापक म्हणून कार्यकाळ दीड वर्ष चांगल्या प्रकारे संभाळून रिसोड आगार अकोला विभागामध्ये उत्पन्नामध्ये भरघोस उत्पन्न देऊन नंबर एक वर वारंवार आल्यामुळे आ व्यवस्थापक यांचे कामगिरी उत्कृष्ट असल्याने महामंडळाने श्री दादाराव कारभारी दराडे यांना पदोन्नती देऊन यवतमाळ विभाग या ठिकाणी विभागीय वाहतूक अधिकारी या पदावर नेमणूक देण्यात आली आहे.

 

 

 

तसेच आगार व्यवस्थापक दराडे साहेब यांच्या काळामध्ये सर्व गाड्या स्वच्छ दोष विरहित असल्याने प्रवासी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं होतं रिसोड आगाराच्या सर्व फेऱ्या तसेच विद्यार्थी फेऱ्या वेळेवर रिसोड आगार व्यवस्थापक दराडे साहेब यांच्या प्रयत्नामुळे सुटत असे असे अधिकारी रिसोड आगाराला मिळाल्यामुळे सर्व जनतेमध्ये व प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं होतं.

 

 

रिसोड आगार व्यवस्थापक दराडे साहेब यांची पदोन्नती झाल्यामुळे यवतमाळ विभागामध्ये विभागीय वाहतूक अधिकारी या पदावर दराडे साहेब रुजू होऊन प्रवाशांची आणि जनतेची सेवा करणार असल्याने चांगले व्यक्तिमत्व उत्कृष्ट कामगिरी बुद्धीच्यातुर्य निर्णय क्षमता स्वच्छ उच्च विचार असल्याने प्रभावशाली व्यक्तिमत्व यामुळे महामंडळाला मोठे योगदान मिळणार आहे.

 

 

 

श्री दराडे साहेब यांना प्रशासनातर्फे तहसीलदार दंडाधिकारी व नायब तहसीलदार दंडाधिकारी रिसोड तालुका तसेच जलसंपदा विभागातील अधिकारी व पोलीस प्रशासन अधिकारी जय लखमा डीएमएलटी अँड पॅरामेडिकल कॉलेज रिसोड चे संचालक सचिन गांजरे यांनी आगार व्यवस्थापक श्री दराडे यांचा स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले आहे तसेच सर्व पत्रकार बंधू यांनी सुद्धा पुढील वाटचालीस शुभेच्छा दराडे साहेब यांना देण्यात आल्या आहे.