
वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरु पाटील
washim : रिठद ते वाशिम ridhad to washim जाण्यासाठी येवती yevati येथील महिला सौ.रंजना प्रकाश जाधव ranjana prakash jadhav वय अंदाजे ४२ यांचा दिं.२५ सष्टे .रोजी मोटरसायकल वर रिठद वरुन वाशिम कडे जातांना मोटरसायकल स्लीप झाल्याने अपघात झाला.त्यामध्ये महीला गंभीर जखमी झाली .हा अपघात दु.१.३० मी.घडला असून त्यांचे नातेवाईक त्या महीलेला वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात घेऊन गेले व तेथे दु.२.२५ मी. भरती करण्यात आले.
परंतू पेशंटची परिस्थिती गंभीर असल्याने या पेशंटला अकोला akola येथील सामान्य रुग्णालयात रेफर केल्याचे नातेवाईकांनी यांनी सांगितले. परंतु या पेशंटला अकोला akola येथे रेफर केल्यानंतर अॅम्बुलन्स उपलब्ध करून देणे गरजेचे होते.तेथे त्यावेळी दु. ३.०० वा अनेक रुग्णवाहिकेची उपलब्धता असतांनाही रुग्णाला रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली नसल्याचा गंभीर आरोप सौ.रंजना प्रकाश जाधव यांच्या नातेवाईकांनी केला. अशा गंभीर रुग्णांना वाशिम washim येथील सामान्य रुग्णालयात ‘रुग्णवाहिका’ उपलब्ध असतांनाच मिळत नाहीत तर त्या रुग्णवाहिका दिखाव्यासाठी आहेत काय?अशा तिव्र भावना नातेवाईकांनी व्यक्त केल्या.
जर वेळेवर कोणतीही गाडी त्या रुग्णाला अकोला akola येथे जाण्यासाठी सापडली नसती तर ! आणी अचानक हा रुग्न दगावला असता तर ? जबाबदारी घ्यायची कुणी ?यासाठी त्यांचे नातेवाईकांनी रुग्णवाहिका अकोला येथे जाण्यासाठी वाशिम जिल्हा शल्य चिकित्सक यांना विनंती करुनही रुग्णवाहिका देण्यात आली नाही असा आरोप नातेवाईकांनी केला.त्यामुळे यांना खाजगी वाहन करावे लागले.वाशिम ग्रामीण रुग्णालय हे नामधारी रूग्णालय झाले येथे जिल्हा रुग्णालय होऊनही सुविधा नाहीत. त्यामुळे अकोला येथे पेशन्टला न्यावे लागते हि वाशिम जिल्ह्यातील washim jilha लोकांसाठी व राजकीय लोकांसाठी शोकांतिका आहे.हेच वाशीम जिल्ह्यातील जनतेचे दुर्दैव आहे.जिल्हा होऊनही कित्येक वर्षे लोटली.यासाठी राजकीय अनास्था जबाबदार आहे.भविष्यात ह्या बाबी घडू नयेत.हिच रास्त अपेक्षा जनतेची आहे.