washim : पत्रकारांसाठी हा ऐतिहासीक क्षण : निलेश सोमाणी

 

पत्रकारांसाठी हा ऐतिहासीक क्षण : निलेश सोमाणी

 

 

वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरु पाटील

 

 

washim : महाराष्ट्र शासनाने पत्रकारांसाठी स्वतंत्र्य आर्थीक विकास महामंडळ व वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी सुध्दा स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा ऐतिहासीक निर्णय घेतला आहे. पत्रकारांसोबतच वृत्तपत्र विक्रेत्यांकरीता महामंडळ सरकारने स्थापन केले ‘पत्रकार’ संघटनेच्या मागणीला न्याय दिला आहे. संपूर्ण देशात पत्रकार व वृत्तपत्र विक्रेता यांच्याकरीता स्वतंत्र आर्थीक विकास महामंडळ स्थापन करणारे महाराष्ट्र राज्य एकमेव राज्य आहे. पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष वसंतराव मुंढे सरचिटणीस विश्वासराव आरोटे व कार्याध्यक्ष प्रविण सपकाळे यांच्या नेतृत्वात दिक्षाभूमी ते मंत्रालय संवाद यात्रा काढण्यात आली होती.

 

 

 

या यात्रेमध्ये पत्रकारांच्या विस मागण्यामध्ये प्रामुख्याने पत्रकारांसाठी आर्थीक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी करण्यात आली होती. ती मागणी मान्य झाल्याने संवादयात्रेला मोठे यश मिळाले आहे. सदर मागणीकरीता प्रदेश अध्यक्ष वसंतराव मुंढे व विदर्भ अध्यक्ष निलेश सोमाणी यांनी गत तिन दिवसांपासून मुंबई mumbai येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस devendra fadnvis व विविध मंत्रीगण यांची भेट घेवून राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत पत्रकारांसाठी आर्थीक विकास महामंडळाची मागणी रेटून धरली होती. महायुती सरकारने सदर मागणी मान्य करून पत्रकार व वृत्तपत्र विक्रेता यांना न्याय दिला आहे. या ऐतिहासीक निर्णयामुळे पत्रकार संघटनेच्या वतीने महाराष्ट्र शासनाचे आभार व्यक्त करून मुंबई येथे विदर्भ अध्यक्ष निलेश सोमाणी व युवा पत्रकार श्याम अपूर्वा यांनी होटल एम्बीसिडर येथे पत्रकार व वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंढे यांचा सत्कार केला.