हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

Washim Crime News: तीन बायका सोडून गेलेल्या विकृताने गाठली विकृतीची परिसीमा; वृद्धेवर अत्याचार करून निर्घृण हत्या

Follow Us:
Washim Crime News – वाशिम रेल्वे स्थानक परिसरात वृद्धेवर अत्याचार करून निर्घृण हत्या प्रकरणी आरोपी अटकेत
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

📍 वाशिम |
🗓️

Washim Crime News | वाकाटकांची ऐतिहासिक राजधानी आणि ‘बालाजींचे शहर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाशिमच्या मातीला काळीमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे.
वाशिम रेल्वे स्थानक परिसरात एका ६० वर्षीय निराधार वृद्धेवर अमानुष अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली.
या गंभीर (Washim Crime News) प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून,
तीन बायका सोडून गेलेला विकृत आरोपी संतोष रामराव खंडारे (रा. अडुळा बाजार, जि. अमरावती) याला वाशिम पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक करून गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे.

आरोपीची पार्श्वभूमी धक्कादायक असून, त्याच्या विकृत वागणुकीला कंटाळून तिन्ही पत्नींनी त्याला सोडून दिले होते.
संसार उद्ध्वस्त झाल्यानंतरही त्याच्या वासनांध प्रवृत्तीला आळा बसला नाही.
८ जानेवारीच्या रात्री एकटी व असहाय्य असल्याचा फायदा घेत आरोपीने वृद्धेवर पाशवी अत्याचार केला आणि
गुन्हा उघडकीस येऊ नये म्हणून मोठ्या दगडाने डोके ठेचून तिची निर्घृण हत्या केली.

सकाळी मृतदेह आढळल्यानंतर वाशिम शहर हादरून गेले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन
पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने तपास हाती घेतला.
परिसरातील ४० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आरोपीची ओळख पटवण्यात आली.
आरोपी अकोल्याच्या दिशेने पळाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी
१० जानेवारी रोजी अकोला रेल्वे स्थानक परिसरातून त्याला ताब्यात घेतले.
पोलिसी चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

रेल्वे स्थानक परिसरात वाढती गुन्हेगारी आणि नशाखोरीमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
वाशिमला सुरक्षित शहर बनवण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक लता फड,
उपविभागीय पोलीस अधिकारी नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून
पुढील तपास सपोनि अरुण नागरे करत आहेत.


🔔 KattaNews.in – सत्य, निर्भीड आणि वेगवान बातम्या

➡️ वाशिम, बुलढाणा, अकोला जिल्ह्यातील ताज्या Crime News
➡️ Google वर ट्रेंडिंग बातम्या
➡️ आमच्याशी जोडले रहा

हे पण वाचा..

नारायणराव आरु पाटील

नारायणराव आरू पाटील हे Katta News चे अधिकृत वाशिम जिल्हा प्रतिनिधी आहेत.ते मागील 10 वर्षांपासून स्थानिक व राज्य पत्रकारितेत कार्यरत असून वाशिम जिल्ह्यातील प्रशासन व सामाजिक विषयांवर वार्तांकन करतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment