प्रतिनिधी/किशन काळे,रिसोड
फेब्रुवारी 2024 पासून वाशिम जिल्हा परिषद मध्ये मुख्य कार्यकारी म्हणून रुजू झाले आणि अल्पावधीतच त्यांनी त्यांची छाप पूर्ण जिल्ह्यामध्ये पडली. त्यांनी अनेक कामचुकार बिनशिस्त अधिकाऱ्यांना शिस्त लावण्याचे कार्य तसेच विविध रखडलेले कामे मार्गे लावली. जिल्हा परिषद शाळा आणि जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत पंचायत समिती आणि इतरही शासकीय कार्यालयावर त्यांनी आपला शिस्तप्रिय कर्तव्यदक्ष पणाचा शिक्का उमटविला.वाशिम जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळेतील जे शिक्षक वेळेवर शाळेत येत नाहीत व शाळेत येऊन विद्यार्थ्यांना शिकवीत नाहीत आणि सतत गैरहजर राहतात अशा अनेक शिक्षकांना त्यांनी कामावरून निलंबित करण्यात केले.
काही महिन्यांपूर्वी त्यांनी वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे गेट बंद केले होते जेणेकरून कोणताही अधिकारी उशिरा पोहोचणार नाही व त्यासोबत विकासाची कामे वाशिम जिल्ह्यामध्ये होत असताना अचानक जिल्हा परिषद अंतर्गत काही संघटनांनी मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांची बदली व्हावी अशी मागणी केली. परंतु अल्पावधीतच संपूर्ण जिल्ह्यामध्ये लोकांच्या मनामध्ये छाप पाडणाऱ्या शिस्तप्रिय व कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदलीची मागणी मागचे नेमके कारण काय..?? असा प्रश्न संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे.
अशा या कर्तेदक्ष पारदर्शक आणि शिस्तप्रिय शासकीय अधिकारी आपल्या वाशिम जिल्ह्यातून मधून गमवायची वेळ येवू नये म्हणून जिल्ह्यातील 50 ते 75 संघटनांनी व एकीकडून पत्रकार बांधवांनी मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांची बदली होऊ नये अशी मागणी करत जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. अनेक संघटनांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेले आहे सीईओ वैभव वाघमारे यांची कोणत्याही अवस्थेमध्ये बदली न करण्यात यावी यासाठी लढा उभारण्याचं निर्धार केला आहे असे अनेक नागरिक प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते निवेदन देतेवेळी हजर होते.