हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

तीन दशकांनंतर पुन्हा एकत्र! वसंतराव नाईक विद्यालय 1995-96 बॅचचा भावनिक स्नेहसंमेलन सोहळा शेंदुर्जनमध्ये रंगला

On: December 30, 2025 5:21 PM
Follow Us:
वसंतराव नाईक विद्यालय शेंदुर्जन 1995-96 बॅचचा भावनिक स्नेहसंमेलन सोहळा
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

कट्टा न्यूज नेटवर्क 

शेंदुर्जन : वसंतराव नाईक विद्यालय शेंदुर्जन येथील सन 1995-96 च्या बॅचचा स्नेहसंमेलन सोहळा तब्बल तीन दशकांनंतर मोठ्या उत्साहात पार पडला. वसंतराव नाईक विद्यालय स्नेहसंमेलन हा केवळ कार्यक्रम न राहता मैत्री, आदर आणि आठवणींनी भरलेला भावनिक क्षण ठरला. वसंतराव नाईक विद्यालय 1995-96 बॅचचे विद्यार्थी पुन्हा एकत्र येताच शाळेच्या सुवर्ण आठवणींना उजाळा मिळाला.

शेंदुर्जन येथील ज्ञानराज मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात तब्बल 65 माजी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या स्नेहसंमेलनात बारामती, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर यासह दुबईसारख्या परदेशात स्थायिक झालेले विद्यार्थीही खास उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक तेजराव ठोसरे सर होते. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर सरस्वती पूजन तसेच छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले.

या स्नेहसंमेलनात आयुष्याला दिशा देणाऱ्या गुरूंना विशेष सन्मान देण्यात आला. तेजराव ठोसरे सर, आर. के. वाघ सर, संतोषराव चेके सर, शाम बोंद्रे सर, सुधाकर गायकवाड सर यांच्यासह पत्रकार एस. पी. शिंगणे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान प्रत्येक विद्यार्थ्याने आपला जीवनप्रवास, सध्याचे कार्यक्षेत्र आणि शाळेतील आठवणी मनोगताच्या माध्यमातून व्यक्त केल्या. अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तर अनेकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ह. भ. प. दामू अण्णा महाराज शिंगणे यांनी केले. सूत्रसंचालन पुरुषोत्तम सृष्टी यांनी तर आभार प्रदर्शन संजय चोपडे सर यांनी मानले.

हा सोहळा यशस्वी करण्यासाठी कैलास शिंगणे, विजय पुरी, संजय जोहरे, दीपक शिंगणे, गजानन नालेगावकर, सुनील परांडे, महेंद्र गवई यांच्यासह इतर माजी विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.


📌 Kattanews.in – वाचकांसाठी खास

अशाच आपल्या परिसरातील प्रेरणादायी, सामाजिक आणि भावनिक बातम्या वाचण्यासाठी Kattanews.in ला दररोज भेट द्या. ही बातमी आवडल्यास शेअर करा.


📰 हे पण वाचा..


 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मलकापूर पांगरा येथे ट्रॅक्टर अपघातात युवकाचा मृत्यू

मलकापूर पांगरा येथे भीषण अपघात! धावत्या ट्रॅक्टरवरून तोल जाऊन युवक चाकाखाली; मदत मिळण्याआधीच मृत्यू?

सिंदखेडराजा येथे प्रशिक्षणादरम्यान उपाशी राहिलेल्या आशा सेविकांचे आंदोलन

सिंदखेडराजात प्रशासनाचा गोंधळ! प्रशिक्षणात शेकडो आशा सेविका उपाशी; एक सेविका बेशुद्ध पडून हात फ्रॅक्चर

मोताळा येथे क्रेन ऑपरेटरचा संशयास्पद मृत्यू, हातावर लिहिलेला शेवटचा संदेश

मोताळ्यात हृदयद्रावक घटना! क्रेन ऑपरेटरने घेतला टोकाचा निर्णय; हातावर लिहिलेला शेवटचा संदेश वाचून धक्का

Buldhana district gram panchayat by election 59 villages voting on 28 April 2026

बुलढाणा जिल्ह्यात 59 ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुका जाहीर; 28 एप्रिलला मतदान, 17 मार्चपासून आचारसंहिता लागू

Mehkar Nagar Parishad court notice over construction despite ban order

मनाई हुकूम असतानाही बांधकाम; मेहकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व ठाणेदारांना कोर्टाची नोटीस

Maharashtra government decision to sell kerosene at petrol pumps due to LPG gas shortage

गॅस टंचाईमुळे मोठा निर्णय! आता पेट्रोल पंपांवर ‘केरोसीन’ मिळणार; विधानसभेत छगन भुजबळांची घोषणा

Leave a Comment