विशाल गवई/चिखली
या वरुड सावित्रीबाई फुले जयंती निमित्त विद्यार्थ्यांनी काढलेल्या प्रभात फेरीत
‘मी सावित्री बोलतेय’ अशा घोषणांनी वरुड दणाणून गेले.
शिक्षण, समानता आणि स्त्री सबलीकरणाचा संदेश देणारी
सावित्रीबाई फुले जयंती नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरली.
विद्यालयापासून जवळच असलेल्या वरुड गावामध्ये विद्यार्थ्यांची भव्य प्रभात फेरी काढण्यात आली.
‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा विजय असो’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर भारावून गेला.
गावातील प्रमुख मार्गांवरून रॅली काढल्यानंतर मुख्य चौकात विशेष कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरुड गावचे सरपंच पती श्री. अमोलभाऊ बुरजे हे होते.
उपसरपंच रंजनाबाई पांडव, पोलीस पाटील संजय पाटील शिवणकर,
तंटामुक्ती अध्यक्ष पंडितभाऊ राऊत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य श्री. संतोष डवले सर यांनी केले.
यानंतर विद्यार्थ्यांनी ‘मी सावित्रीबाई फुले बोलतेय’,
‘मी राजमाता जिजाऊ बोलतेय’ या विषयांवर प्रभावी भाषणे सादर केली.
कुमारी साक्षी गोरे, श्रावणी गोरे, गौरी पोतदार, धीरज जाधव,
प्राची पोतदार आणि मान्यता पांडव यांनी उपस्थितांची मने जिंकली.
संस्थेचे विश्वस्त श्री. संतोषभाऊ दांडगे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत
विद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीची माहिती दिली.
हा कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष श्री. मनोजभाऊ दांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी झाला.
हे पण वाचा..
अखेर कारवाई! शिंदी येथील तत्कालीन ग्रामसेवक दिनकर काळे निलंबित — महिलांशी गैरवर्तन व धमकी प्रकरण.
सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक श्री. राजेंद्र गायकवाड सर यांनी केले,
तर आभार प्रदर्शन श्री. आकाश डोंगरे सर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशासाठी सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी आणि ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.
👉 वाचकांसाठी आवाहन
अशाच स्थानिक, प्रेरणादायी आणि सामाजिक बातम्यांसाठी
Kattanews.in ला नियमित भेट द्या.
आपली बातमी, आपला आवाज — Kattanews.in
📰 हे पण वाचा..
- “बाई मेली तरी मला फरक पडत नाही!” — सिंदखेडराजा तालुक्यातील वडाळी ग्रामपंचायत भ्रष्टाचारावर महिलाचे आमरण उपोषण; झेडपी CEO चा कथित संतापजनक उद्गार.
- अखेर मायेचा विजय! मादी बिबट्या पिलासाठी परतली; पिल्लू घेऊन जंगलात पसार — क्षण कॅमेऱ्यात कैद.
- शिक्षणातून परिवर्तन: सावित्रीबाई फुलेंचा विचार आजही प्रेरणादायी












