बुलढाणा |१३ फेब्रुवारी २०२६
पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे रविवारी (दि. 8 फेब्रुवारी) महेश प्रोफेशनल फोरमच्या वतीने ‘महेश आयडॉल सीझन 14’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्वर्गीय रामेश्वर आसाराम मंत्री यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही राष्ट्रीय स्पर्धा दरवर्षी घेतली जाते.
स्पर्धेत परिचय फेरी, प्रोफाइल स्क्रीनिंग आणि प्रश्न-उत्तर फेरी अशा विविध टप्प्यांमधून स्पर्धकांची कसून चाचणी घेण्यात आली. व्यक्तिमत्त्व विकास, सामाजिक भान, ज्ञान आणि सादरीकरण कौशल्य या निकषांवर मूल्यमापन करण्यात आले. या सर्व फेऱ्यांमध्ये तुषार डोडिया यांनी उत्कृष्ट कामगिरी करत देशातून दुसरा क्रमांक पटकावला.
उपविजेता म्हणून त्यांना चांदीचे मूळ पदक, आकर्षक ट्रॉफी, स्मृतिचिन्ह आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या यशामुळे बुलढाणा जिल्हा आणि मलकापूर पांगरा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आपल्या यशाबद्दल बोलताना तुषार डोडिया यांनी या यशाचे श्रेय आई-वडील, गुरुजन, मित्रपरिवार आणि समाज बांधवांना दिले. “त्यांच्या मार्गदर्शन आणि पाठबळामुळेच हे यश शक्य झाले,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
तुषार डोडिया यांच्या या राष्ट्रीय यशामुळे ग्रामीण भागातील तरुणांमध्ये स्पर्धात्मक क्षेत्रात पुढे येण्याची प्रेरणा निर्माण झाली आहे. त्यांच्या या गगनभरारी कामगिरीमुळे बुलढाणा जिल्ह्याचा मान देशपातळीवर उंचावला आहे.
Related News
- चिखली-बुलढाणा रोडवर भीषण अपघात! परीक्षेला निघालेल्या 23 वर्षीय युवकाचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
- AI मुळे स्मार्ट शेतीचा नवा अध्याय; मेरा बुद्रुक येथे मार्गदर्शन
- साखरखेर्डाला मोठी भेट! अप्पर तहसीलदार कार्यालय मंजूर; ३५ वर्षांच्या मागणीला यश
👉 अशाच बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या, विश्वसनीय आणि Google वर ट्रेंड होणाऱ्या बातम्यांसाठी नियमित भेट द्या – Kattanews.in













