हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

धक्कादायक! रिसोडमध्ये BLO चा कामचुकारपणा; मतदार नोंदणी धोक्यात

Follow Us:
रिसोडमध्ये BLO कामचुकारपणामुळे मतदार नोंदणी प्रक्रियेत गोंधळ

रिसोड, वाशिम| २८ मार्च २०२६

रिसोड शहरात सुरू असलेल्या SIR प्रक्रियेदरम्यान BLO चा कामचुकारपणा समोर आला असून त्यामुळे मतदार नोंदणी प्रक्रियेत गंभीर गोंधळ निर्माण झाला आहे. घरोघरी जाऊन माहिती संकलन करण्याऐवजी काही BLO फोनवरच प्रक्रिया करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणामुळे सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून अनेक मतदार नोंदणीपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

माजी नगरसेवक फैय्याज अहमद यांनी 27 मार्च रोजी मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडे याबाबत अधिकृत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, रिसोड नगर परिषदेत तहसीलदार यांच्या उपस्थितीत 24 मार्च रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीत BLO यांनी प्रत्यक्ष क्षेत्रात जाऊन नागरिकांना मदत करावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. मात्र, काही BLO यांनी या सूचनांकडे दुर्लक्ष करून कामचुकारपणा केल्याचा आरोप आहे.

विशेषतः यादी क्रमांक 287, 284, 302 आणि 306 या भागातील BLO आपल्या जबाबदाऱ्या योग्यरित्या पार पाडत नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करून BLO ना सक्त सूचना द्याव्यात, जेणेकरून मतदार नोंदणी प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शकपणे पार पडेल, अशी मागणी करण्यात आली आहे.

या वेळी प्रा. विजय तुरुकमाने, गजानन निखाते, साजिद खान, तारीक खान, युसुफ मन्सुरी, मोहम्मद जमील आदी उपस्थित होते.


👉 Related News


📢 तुमच्या परिसरातील बातम्या आम्हाला पाठवा – Kattanews.in वर प्रसिद्ध करा

 

नारायणराव आरु पाटील

नारायणराव आरू पाटील हे Katta News चे अधिकृत वाशिम जिल्हा प्रतिनिधी आहेत.ते मागील 10 वर्षांपासून स्थानिक व राज्य पत्रकारितेत कार्यरत असून वाशिम जिल्ह्यातील प्रशासन व सामाजिक विषयांवर वार्तांकन करतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

हर घर तिरंगा अभियानासाठी बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

‘हर घर तिरंगा’ अभियानासाठी बुलढाणा जिल्हा सज्ज; जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे मोठे आवाहन

साखरखेर्डा येथे सुसज्ज बसस्थानक उभारण्याची मागणी

७५ गावांच्या प्रवाशांचा प्रश्न कधी सुटणार? साखरखेर्ड्यात सुसज्ज बसस्थानकासाठी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे साकडे

ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते अभिनेत्री व पत्रकार किरण वाघ यांना साई प्रेरणा गौरव पुरस्कार प्रदान करताना

शिर्डीत किरण वाघ यांचा दुहेरी गौरव! ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते ‘साई प्रेरणा गौरव पुरस्कार’

लोणार नगरपरिषदेत घरकुल योजनांतील अनियमिततेविरोधात निवेदन देताना डॉ. गोपालसिंह बछिरे व शिवसेना उ.बा.ठा. पदाधिकारी

घरकुल योजनांतील अनियमिततेविरोधात शिवसेना उ.बा.ठा. आक्रमक; 15 दिवसांत माहिती न दिल्यास लोणार नगरपरिषदेसमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा

उत्रादा ग्रामपंचायत कार्यालयाला महिलांचा घेराव; अर्धवट रस्त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

उत्रादा ग्रामपंचायतीचा हलगर्जीपणा; ग्रामपंचायत कार्यालयाला महिलांचा घेराव, अर्धवट रस्त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

एअरबॅगमुळे 75 वर्षीय वकिलाचा जीव वाचला; मेहकर येथे आयशरच्या धडकेत कारचा चक्काचूर

मेहकरमधील ज्येष्ठ वकिलाच्या कारला भरधाव आयशरची समोरून धडक; भीषण अपघातात कारचा चक्काचूर

Leave a Comment