वाशिम | २८ जानेवारी २०२६
वाशीम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील तऱ्हाळा येथे दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी मराठी मनाचे मानबिंदू, महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि सामाजिक जीवनावर अमिट ठसा उमटवणारे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमात तऱ्हाळा येथील युवक, बालमित्र व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. फिरस्ती महाराज संस्थान, तऱ्हाळा येथे आयोजित या जयंती कार्यक्रमात गोपाल भाऊ देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी भावपूर्ण आदरांजली अर्पण करून बाळासाहेबांच्या विचारांना अभिवादन केले.
या वेळी माजी सरपंच विकी भाऊ महल्ले, अजय भाऊ मोहळे, उपसरपंच तसेच फिरस्ती महाराज संस्थानचे अध्यक्ष सुरेश वाघमारे यांच्यासह गणेश ठाकरे, विठ्ठल खंडारे, दत्ताभाऊ गाडेकर, गोपाल देशमुख, गौरव आगळे, प्रवीण महल्ले, सुरज इंगळे, कृष्णा, दिलीप लिंगाडे, धामणकर, शुभम खंडारे, यश खंडारे यांसह अनेक युवक व कार्यकर्ते उपस्थित होते.
बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हक्कांसाठी, अस्मितेसाठी आणि हिंदुत्वाच्या विचारासाठी केलेले कार्य सदैव प्रेरणादायी राहील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. या जयंती कार्यक्रमामुळे तऱ्हाळा गावात सामाजिक एकतेचे व मराठी अस्मितेचे दर्शन घडले.
📌 हे पण वाचा..
➡️ रिसोडमधील संत ज्ञानेश्वर विद्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात; मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण
➡️ “सिकलसेलमुक्त भविष्यासाठी रक्तचाचणी गरजेची!” – ना. प्रतापराव जाधव यांचे आवाहन
📢 Kattanews.in – ग्रामीण, सामाजिक आणि राजकीय घडामोडींचे विश्वासार्ह व्यासपीठ.










