हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा गेला… सुलतानपूरमध्ये 24 वर्षीय बेरोजगार युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

On: March 8, 2026 6:03 PM
Follow Us:
सुलतानपूर येथे बेरोजगार युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

सुलतानपूर | ८ मार्च २०२६

सुलतानपूर येथे एका बेरोजगार युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ७ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत असून परिसरात शोककळा पसरली आहे.

सुलतानपूर येथील वयोवृद्ध भिमराव दळवी (महाराज) यांचा एकुलता एक मुलगा दत्तात्रय भिमराव दळवी (वय २४) याने गावालगत असलेल्या कालव्यावरील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.

दत्तात्रय हा बेरोजगार असून शांत स्वभावाचा युवक म्हणून गावात ओळखला जात होता. धार्मिक वृत्तीचे आई-वडील असलेल्या दळवी कुटुंबावर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

वृद्धापकाळात एकुलता एक मुलगा गमावल्याने आई-वडील अक्षरशः पोरके झाले आहेत. विशेष म्हणजे मृतकाच्या जवळच्या नातेवाईकांच्या घरी त्याच दिवशी लग्न समारंभ असल्यामुळे घरात पाहुण्यांची ये-जा आणि लगबग सुरू होती. अशा परिस्थितीत ही घटना समोर आल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृतकाच्या पश्चात आई-वडील आणि बहीण असा परिवार आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून या प्रकरणी मेहकर पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून मर्ग दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा पुढील तपास हेडकॉन्स्टेबल शिवानंद केदार, राजेश जाधव, कॉन्स्टेबल पांडे आणि सुनिल नागरे करीत आहेत.


Related News


अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या.

 

विनायक कुटे

विनायक कुटे हे कट्टा न्यूज (Kattanews.in) चे प्रतिनिधी असून सामाजिक, प्रशासकीय आणि जनहिताच्या विषयांवर सातत्याने वार्तांकन करतात. नियमभंग, नागरिकांच्या समस्या, सार्वजनिक हिताशी संबंधित प्रश्न आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकणे, ही त्यांच्या पत्रकारितेची ओळख आहे. सत्य, अचूक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

सिंदखेड राजा गरुड मूर्ती पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देताना विजय सोनुने आणि इतर

सिंदखेड राजा येथील गरुड मूर्ती अखेर सापडली; महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाच्या स्वाधीन

देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयाची इमारत, प्रिया कदम मृत्यू प्रकरण

पोलीस भरतीची तयारी, भविष्यासाठी स्वप्नं…गारखेड्यातील २० वर्षीय प्रिया कदम यांचा देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयात मृत्यू; नेमकं कारण काय?

समृद्धी महामार्ग हॉटेल आग - दुसरबीड येथील रमावि हॉटेलमधून निघणारा धूर

समृद्धी महामार्गावर हॉटेलला दुसरबीडजवळ रमावि हॉटेलमध्ये अचानक आग; शॉर्टसर्किटमुळे धुराचे लोट, सुरक्षा बल-क्युआरव्ही पथक धावले

साखरखेर्डा येथे अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा सन्मान करताना भाजपचे मान्यवर

साखरखेर्ड्यात अंगणवाडी सेविका-मदतनीसांचा सन्मान; पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपचा उपक्रम

सिंदखेडराजा ग्रामपंचायत प्रशासक नियुक्ती ४३ गावांची यादी

सिंदखेडराजातील ४३ ग्रामपंचायतींवर पुन्हा प्रशासक! पाहा गावनिहाय नियुक्तीची संपूर्ण यादी

वाकोडी (मलकापूर) येथे भरदुपारी पोत हिसकावण्याचा प्रयत्न झालेले काजळे यांचे घर

भरदुपारी चाकूचा धाक दाखवून महिलेची पोत हिसकावण्याचा प्रयत्न; आरडाओरड होताच तरुण धावले अन् चोरट्याने पळ काढला!

Leave a Comment