हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

लोणारमध्ये स्प्रिंकलरच्या 1,000 तोट्यांची धक्कादायक चोरी; शेतकऱ्यांची सिंचन व्यवस्था कोलमडली

On: December 10, 2025 1:46 PM
Follow Us:
लोणारमध्ये स्प्रिंकलरच्या 1,000 तोट्यांची चोरीची घटना
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

लोणार प्रतिनिधी/विनायक कुटे

लोणार तालुक्यात स्प्रिंकलर तोट्यांची चोरी पुन्हा एकदा वाढली असून या वेळी तब्बल 1,000 स्प्रिंकलर तोट्यांची चोरी झाल्याची घटना ६ डिसेंबरच्या मध्यरात्री घडली. शारा, पिंपळखुटा आणि वडगाव तेजन शिवारात स्प्रिंकलर तोट्यांची चोरी झाल्याने शेकडो शेतकऱ्यांची सिंचन व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. रब्बी हंगामाच्या तोंडावर स्प्रिंकलर तोट्यांची चोरी होणे हे शेतकऱ्यांसाठी मोठे संकट ठरले आहे.शारा, पिंपळखुटा व वडगाव तेजन शिवारात गहू, हरभरा, कांदा आणि इतर रब्बी पिकांची पेरणी नुकतीच पूर्ण झाली आहे. पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले पाणी सुरळीत मिळावे म्हणून शेतकऱ्यांनी महागडे स्प्रिंकलर संच बसविले होते. काही संचांची किंमत हजारोंमध्ये तर काहींची किंमत लाखोंपर्यंत आहे.

मात्र अज्ञात चोरट्यांनी स्प्रिंकलर संचातील एक हजार तोटे रातोरात लंपास केल्याने शेतकऱ्यांची सिंचन व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली आहे. “कर्ज काढून स्प्रिंकलर लावले, पण तोट्या चोरीला गेल्याने पाणी देणेच बंद पडले,” अशी खंत शेतकरी व्यक्त करत आहेत.

या प्रकरणी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस तपास सुरू आहे. काही दिवसांपूर्वी जवळच्या गावातही अशाच प्रकारे स्प्रिंकलर साहित्य चोरीला गेल्याची नोंद आहे. चोरीच्या वाढत्या घटनांमुळे रात्री गस्त वाढवण्याची आणि शिवारात टेहळणी पथक तैनात करण्याची मागणी होत आहे.

हे पण वाचा..

जिल्ह्यात तिळाचे 100% मोफत बियाणे वितरण सुरू; शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन अर्जाची मोठी संधी.

रब्बी हंगामात सुरुवातीचे पाणी देणे अत्यंत महत्त्वाचे असते. अशातच स्प्रिंकलर तोट्यांची चोरी झाल्याने पिकांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवामानातील अनिश्चितता आणि वाढत्या चोरीच्या घटना—या दुहेरी संकटामुळे शेतकरी प्रचंड चिंतेत आहेत.


👉 हे आवश्यक करा.

✔ आपल्या भागातील चोरीच्या घटनांची माहिती आम्हाला पाठवा
✔ Agriculture चोरी संबंधित व्हिडिओ/फोटो WhatsApp वर पाठवा
✔ ग्रामीण सुरक्षेबाबत जागरूकता वाढवूया – kattanews.in ला फॉलो करा


🔍 हे पण वाचा..

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मलकापूर पांगरा येथे ट्रॅक्टर अपघातात युवकाचा मृत्यू

मलकापूर पांगरा येथे भीषण अपघात! धावत्या ट्रॅक्टरवरून तोल जाऊन युवक चाकाखाली; मदत मिळण्याआधीच मृत्यू?

सिंदखेडराजा येथे प्रशिक्षणादरम्यान उपाशी राहिलेल्या आशा सेविकांचे आंदोलन

सिंदखेडराजात प्रशासनाचा गोंधळ! प्रशिक्षणात शेकडो आशा सेविका उपाशी; एक सेविका बेशुद्ध पडून हात फ्रॅक्चर

मोताळा येथे क्रेन ऑपरेटरचा संशयास्पद मृत्यू, हातावर लिहिलेला शेवटचा संदेश

मोताळ्यात हृदयद्रावक घटना! क्रेन ऑपरेटरने घेतला टोकाचा निर्णय; हातावर लिहिलेला शेवटचा संदेश वाचून धक्का

Buldhana district gram panchayat by election 59 villages voting on 28 April 2026

बुलढाणा जिल्ह्यात 59 ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुका जाहीर; 28 एप्रिलला मतदान, 17 मार्चपासून आचारसंहिता लागू

Mehkar Nagar Parishad court notice over construction despite ban order

मनाई हुकूम असतानाही बांधकाम; मेहकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व ठाणेदारांना कोर्टाची नोटीस

Mehkar Hotel Ekant police raid sex racket two women rescued

मेहकर बायपासवरील ‘हॉटेल एकांत’मध्ये देहव्यापाराचा पर्दाफाश; पोलिसांच्या छाप्यात दोन महिलांची सुटका

Leave a Comment