साखरखेर्डा | २२ फेब्रुवारी २०२६
सिंदखेडराजा तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींवर सरपंचच प्रशासक म्हणून काम पाहणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. ग्रामपंचायतींची मुदत संपल्यानंतर प्रशासन कोण सांभाळणार याबाबत संभ्रम असताना, आता निवडणुका होईपर्यंत विद्यमान सरपंच, उपसरपंच व सदस्य यांच्याकडेच कारभार सोपवण्यात आला आहे. या निर्णयामुळे ग्रामीण प्रशासनात सातत्य राहणार असून विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा, शेंदुर्जन, मलकापूर पांग्रा, दुसरबीड, किनगावराजा आदी मोठ्या ग्रामपंचायतींना या निर्णयाचा लाभ होणार आहे. त्यामुळे स्थानिक विकासकामे अडथळ्याविना सुरू राहतील, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
साखरखेर्डा येथील सरपंच सौ. ज्योती अमित जाधव यांना सरपंचपदी निवडून केवळ दहा महिने झाले होते. शासनाच्या नव्या निर्णयामुळे त्यांना पुन्हा काम करण्याची संधी मिळाली असून गावातील रस्ते व नाली कामांना गती मिळावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
हे पण वाचा..
- शेगाव नगरपरिषदेत अर्थसंकल्प फेटाळला; राजकीय वातावरण तापले
- लोणार तालुक्यातील गावात तणाव; महिला पदाधिकाऱ्यांवर हल्ला
- ग्रामीण भागात विकासकामांना निधी वितरणाची नवी योजना
📢 आपल्या परिसरातील बातम्या आम्हाला पाठवा
आपल्या गावातील घडामोडी, समस्या किंवा सकारात्मक बातम्या आम्हाला पाठवा. निवडक बातम्या Kattanews.in वर प्रकाशित केल्या जातील.
WhatsApp: 9561475736
Email: kattanews@gmail.com










