सिंदखेड राजा (जि. बुलढाणा):
डॉ. प्रकाश चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा अनमोल चौधरी गंभीर जखमी झाला आहे. हा
स्कुटी अपघात सिंदखेड राजा शहराच्या हद्दीत ३ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, सिंदखेड राजा येथील रहिवासी आणि प्रसिद्ध डॉक्टर
डॉ. प्रकाश किसन चौधरी (वय ६०) हे आपल्या मुलगा अनमोल प्रकाश चौधरी (वय २५) यांच्यासोबत
जालना येथून काम आटोपून सिंदखेड राजा शहराकडे परतत होते. दरम्यान नसराबाद फाट्याजवळील हॉटेल जगदंब समोर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या
एका ट्रकला स्कुटीची धडक बसली.
ही धडक इतकी भीषण होती की डॉ. प्रकाश चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा अनमोल चौधरी गंभीर
जखमी झाला असून त्याला तातडीने जालना येथील एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच सिंदखेड राजा पोलीस ठाण्याचे ठाणेदार आशिष इंगळे, ज्ञानेश्वर दहातोंडे आणि विकास राऊत यांनी घटनास्थळी धाव घेतली.
१०८ रुग्णवाहिका बोलावून अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्यात आली.
डॉ. प्रकाश चौधरी यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला आहे. या
SINDKHED RAJA accident प्रकरणी ठाणेदार आशिष इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे सिंदखेड राजा शहरात आणि परिसरात शोककळा पसरली आहे.
Tags:
SINDKHED RAJA accident, Doctor Prakash Chaudhary, स्कुटी अपघात, truck accident news, Jalna news, Buldhana news, Maharashtra news, Marathi news, road accident, breaking news










