हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

शेतकरी पुत्राची आत्महत्या : सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे मेरा खुर्द हादरले

On: December 23, 2025 9:59 AM
Follow Us:
मेरा खुर्द येथे कर्जबाजारीपणामुळे शेतकरी पुत्राने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

शिवराज मांटे/प्रतिनिधी 

मेरा खुर्द (बुलढाणा) : शेतकरी आत्महत्या हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला असून, मेरा खुर्द शेतकरी आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. सततची नापिकी, वाढते कर्ज आणि आर्थिक विवंचनेतून ३५ वर्षीय शेतकरी पुत्र अनिल गंगाराम उदार यांनी आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना १९ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली.

अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मेरा खुर्द येथील रहिवासी गंगाराम हरीभाऊ उदार यांच्याकडे गट नंबर २२१ मध्ये कोरडवाहू शेती आहे. त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा मेरा खुर्द येथून ३१ हजार रुपयांचे पीक कर्ज घेतले होते. तसेच त्यांचा मुलगा अनिल उदार यांनी बालाजी अर्बन पतसंस्था, चिखली येथून १ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते.

यावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे शेतातील उत्पन्न अपेक्षेप्रमाणे न झाल्याने कर्जबाजारी शेतकरी म्हणून अनिल उदार यांच्यावर मानसिक ताण वाढत गेला. कर्जाची परतफेड कशी करायची, कुटुंबाचा खर्च कसा भागवायचा या विवंचनेतून तो सतत नैराश्यात होता. घरातील सर्व सदस्य मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.

या मानसिक तणावातूनच अनिल उदार यांनी १९ डिसेंबर रोजी सकाळी शेतात जात असल्याचे सांगून घर सोडले. शेतात गेल्यानंतर त्यांनी एका गोंधणीच्या झाडाला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. काही वेळाने त्यांचा भाऊ संजय उदार शेतात पोहोचला असता दुरूनच भावाने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांनी तात्काळ भावाला उचलण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत अनिल उदार यांचा मृत्यू झाला होता.

हे पण वाचा..

मलकापूरमध्ये भीषण अपघात! चारचाकी झाडावर आदळली, ३ युवक ठार; २ गंभीर जखमी.

या घटनेची माहिती सरपंच रमेश अवचार, पोलीस पाटील संजय ठाकूर यांना देण्यात आली. त्यांनी त्वरित अंढेरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार रुपेश शक्करगे यांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मर्ग दाखल केला आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे अनिल उदार हे घरातील कर्ते पुरुष गेल्याने आई-वडील, पत्नी, दोन लहान मुले व भाऊ यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शेतकरी आत्महत्या बुलढाणा जिल्ह्यात वाढत चालल्याने प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.


📢 वाचा आणि शेअर करा

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा.


🔗 हे पण वाचा..

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मलकापूर पांगरा येथे ट्रॅक्टर अपघातात युवकाचा मृत्यू

मलकापूर पांगरा येथे भीषण अपघात! धावत्या ट्रॅक्टरवरून तोल जाऊन युवक चाकाखाली; मदत मिळण्याआधीच मृत्यू?

सिंदखेडराजा येथे प्रशिक्षणादरम्यान उपाशी राहिलेल्या आशा सेविकांचे आंदोलन

सिंदखेडराजात प्रशासनाचा गोंधळ! प्रशिक्षणात शेकडो आशा सेविका उपाशी; एक सेविका बेशुद्ध पडून हात फ्रॅक्चर

मोताळा येथे क्रेन ऑपरेटरचा संशयास्पद मृत्यू, हातावर लिहिलेला शेवटचा संदेश

मोताळ्यात हृदयद्रावक घटना! क्रेन ऑपरेटरने घेतला टोकाचा निर्णय; हातावर लिहिलेला शेवटचा संदेश वाचून धक्का

Buldhana district gram panchayat by election 59 villages voting on 28 April 2026

बुलढाणा जिल्ह्यात 59 ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुका जाहीर; 28 एप्रिलला मतदान, 17 मार्चपासून आचारसंहिता लागू

Mehkar Nagar Parishad court notice over construction despite ban order

मनाई हुकूम असतानाही बांधकाम; मेहकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व ठाणेदारांना कोर्टाची नोटीस

Maharashtra government decision to sell kerosene at petrol pumps due to LPG gas shortage

गॅस टंचाईमुळे मोठा निर्णय! आता पेट्रोल पंपांवर ‘केरोसीन’ मिळणार; विधानसभेत छगन भुजबळांची घोषणा

Leave a Comment