हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

शासनाला थकीत देयके निकाली काढायचे नाहीत का? शिक्षक-प्राध्यापकांचे पाच ते सहा वर्षांपासूनचे पैसे रखडले

Follow Us:
महाराष्ट्रातील शिक्षक व प्राध्यापक थकीत देयके प्रलंबित
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

वाशिम | २ जानेवारी २०२६

महाराष्ट्रातील प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी बांधवांची गेल्या पाच ते सहा वर्षांपासूनची थकीत देयके अजूनही शासनाने निकाली काढलेली नाहीत. दरवर्षी संबंधित कर्मचाऱ्यांकडून थकीत बिले सादर केली जातात, मात्र निधीअभावी ती परत-परत रखडत असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे.

सन 2024-25 मध्ये डायरेक्टर लेव्हलपर्यंत गेलेली अनेक बिले निधी नसल्यामुळे रिजेक्ट करण्यात आली होती. पुन्हा थकीत बिले सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर सन 2025-26 मध्ये एकदा पुन्हा सर्व कर्मचाऱ्यांनी आपली थकीत देयके सादर केली आहेत.

मात्र संपूर्ण महाराष्ट्रात अजूनही मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची देयके प्रलंबित आहेत. सर्व कर्मचाऱ्यांनी वेतन पथक कार्यालयात थकीत देयके सादर केली असून संबंधित कार्यालयाकडून बिले तपासून पुढे पाठवली जाणार आहेत. मात्र कालावधी कमी असल्यामुळे बिले पुन्हा रिजेक्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर शासनाने महाराष्ट्रातील वेतन पथक कार्यालयांना बिल तपासणीसाठी अधिक कालावधी द्यावा, जेणेकरून सर्व कर्मचाऱ्यांची बिले योग्य पद्धतीने तपासून पुढे पाठवता येतील, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.

तसेच सन 2025-26 मधील सर्व थकीत देयके याच आर्थिक वर्षात निकाली काढावीत, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

3379, 3361, 0511 हेडवरील निधी कायम अपुरा

विशेषतः हेड क्रमांक 3379, 3361 आणि 0511 अंतर्गत येणारी थकीत देयके निधीअभावी नेहमीच मागे पडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शासनाने या हेडकडे गांभीर्याने लक्ष देऊन पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

ही मागणी स्वराज्य शिक्षक संघटनेचे वाशीम जिल्हाध्यक्ष श्री. जी. एस. बोरकर यांनी केली असून, शासनाने तत्काळ निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.


📌 संबंधित बातम्या


👉 अशाच ताज्या, निर्भीड आणि जनहिताच्या बातम्यांसाठी Kattanews.in ला भेट देत रहा.

 

नारायणराव आरु पाटील

नारायणराव आरू पाटील हे Katta News चे अधिकृत वाशिम जिल्हा प्रतिनिधी आहेत.ते मागील 10 वर्षांपासून स्थानिक व राज्य पत्रकारितेत कार्यरत असून वाशिम जिल्ह्यातील प्रशासन व सामाजिक विषयांवर वार्तांकन करतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मलकापूर पांगरा येथे ट्रॅक्टर अपघातात युवकाचा मृत्यू

मलकापूर पांगरा येथे भीषण अपघात! धावत्या ट्रॅक्टरवरून तोल जाऊन युवक चाकाखाली; मदत मिळण्याआधीच मृत्यू?

सिंदखेडराजा येथे प्रशिक्षणादरम्यान उपाशी राहिलेल्या आशा सेविकांचे आंदोलन

सिंदखेडराजात प्रशासनाचा गोंधळ! प्रशिक्षणात शेकडो आशा सेविका उपाशी; एक सेविका बेशुद्ध पडून हात फ्रॅक्चर

मोताळा येथे क्रेन ऑपरेटरचा संशयास्पद मृत्यू, हातावर लिहिलेला शेवटचा संदेश

मोताळ्यात हृदयद्रावक घटना! क्रेन ऑपरेटरने घेतला टोकाचा निर्णय; हातावर लिहिलेला शेवटचा संदेश वाचून धक्का

Buldhana district gram panchayat by election 59 villages voting on 28 April 2026

बुलढाणा जिल्ह्यात 59 ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुका जाहीर; 28 एप्रिलला मतदान, 17 मार्चपासून आचारसंहिता लागू

Mehkar Nagar Parishad court notice over construction despite ban order

मनाई हुकूम असतानाही बांधकाम; मेहकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व ठाणेदारांना कोर्टाची नोटीस

Maharashtra government decision to sell kerosene at petrol pumps due to LPG gas shortage

गॅस टंचाईमुळे मोठा निर्णय! आता पेट्रोल पंपांवर ‘केरोसीन’ मिळणार; विधानसभेत छगन भुजबळांची घोषणा

Leave a Comment