sakharkherda : किरकोळ वाद उफाळून आल्यानंतर संतापाच्या भरात पतीने धारदार विळ्याने वार करून पत्नीचा खून केला. ‘लोणी (लव्हाळा)’ येथे २७ सप्टेंबरला दुपारी ही घटना घडली. या प्रकरणी साखरखेर्डा sakharkherda पोलिसांनी पतीस ताब्यात घेतले आहे. येथून जवळच असलेल्या लोणी लव्हाळा येथे नंदकिशोर देशमुख nandkishor deshmukh व पत्नी प्रगती pragati आपल्या दोन मुलांसह राहात होते. २७ सप्टेंबरला दुपारी पत्नी प्रगती व पती नंदकिशोर यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला.
या कडाक्याच्या भांडणात रागाचा पारा चढलेल्या नंदकिशोर देशमुखने nandkishor deshmukh धारदार विळ्याने प्रगतीवर सपासप वार केले. यात तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच गावात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी साखरखेर्डा ठाणेदार गजानन करेवाड यांना माहिती दिल्यानंतर आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. घटनेचा पंचनामा केल्यानंतर प्रगतीचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही. देशमुख दाम्पत्याला दोन मुले असून, ते आईला मुकले आहेत. पतीने पत्नीची हत्या करून आपला संसार उद्ध्वस्त केल्याच्या घटनेने संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.