शेतकऱ्याच्या शेतातील सोयाबीनची सुडी दिली पेटवून,तोंडाशी आलेला घास घेतला हिरावून.

 

 

मेहकर प्रतिनिधी

 

शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास अज्ञात व्यक्तीने घेतला हिरावून. मेहकर तालुक्यातील परतापुर या ठिकाणी शेतकरी राजेंद्र वाघ यांच्या शेतातील 25 सप्टेंबर च्या सायंकाळी सहा ते सात वाजताच्या दरम्यान सोयाबीनच्या सुडीला अज्ञात व्यक्तीने आग लावून दिल्यामुळे सोयाबीनची सुडी जळून खाक झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे 2 लाखांचे नुकसान झाले.

 

 

 

सविस्तर शेतकरी राजेंद्र वाघ यांच्या शेतातील कामावरील गडी माधव खनपटे यांनी शेतातील सोयाबीन सुडी एकत्र करून ताडपत्रीने झाकली व घरी आले. सायंकाळी ७ वाजता राजेंद्र वाघ यांना त्यांच्या भावाचा फोन आला की तुमच्या शेतात आग लागल्याचे दिसत आहे. तत्काळ राजेंद्र वाघ व त्यांचे भाऊ शेतात गेले असता सोयाबीनची सुडी पेटलेली दिसली. २ लाख रुपयांचे नुकसान झाले. महसूल विभागाने पंचनामा केला. याप्रकरणी पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे.