आरोग्य विभागात नोकरीचे आमिष दाखवून खोटं नियुक्तीपत्र ही दिलं, 10 लाखांनी फसवणूक.

 

 

आरोग्य विभागात आरोग्य सेवक पदावर नोकरीवर लावून देण्याचे आमिष देत, एका ३८ वर्षीय युवकाची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी युवकाच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.तालुक्यातील कुंबेफळ येथील बळीराम त्र्यंबक सावरकर या युवकाला लिलाधर सदाशिव खवले आणि नरहरी लिलाधर खवले (रा. कठोरा ता. शेगाव.ह.मु. स्वामी टॉवर, समन्वय नगर खामगाव) यांनी १० मे २०२० रोजी आरोग्य विभागात आरोग्य सेवक पदाची भरती सुरू असल्याचे सांगून दोघांनी विश्वास संपादन केला.

 

 

नोकरीसाठी संबंधितांनी दहा लाखांची मागणी केली. त्यावेळी रक्कमेची जुळवाजुळव करून १५ ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी आरोपींना गणेश तुळशीराम टवलारकर, सतीश हरिभाऊ शहाणे यांच्या समक्ष समन्वय नगर जवळील भुयारी मार्गाजवळ दिले त्यानंतर संबंधितांनी आरोग्य सेवा संचालनालय (महाराष्ट्र राज्य) चे जा पत्र क्रमाका जा रजि.प/आस्था/ २६३/२०२०/४६६ दि.०३.०९.२०२० रोजीचे असे नियुक्ती पत्र दिले.

 

 

नियुक्ती पत्र देऊन अनेक दिवस उलटून ही आपल्याला कामावर रुजून केल्यामुळे आपण खामगाव ग्रामीण रुग्णालय चौकशी केली असता, नियुक्तीपत्र बनावट असल्याचे निदर्शनास आल्याने फसवणूक झाल्याचे समजताच संबंधितांना गणेश टवलारकर यांच्यासोबतच लिलाधर सदाशिव खवले व नरहरी लिलाधर खवले यांची भेट घेतली. त्यांना दिलेले दहा लाख रुपये परत मागितले. त्यावेळी संबंधितांनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेचा धनादेश दिला. तो धनादेश परत आल्याचे व्यक्तीने तक्रारीत म्हटले. याप्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा जुलै पूर्वीचा असल्याने भादंवि कलम ४२०, ५०४, ३४ अन्वये १४ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल केला.