दिवाळी जाहिरात बुकिंग - KattaNews.in
📢 KattaNews.in जाहिरात सेवा
आपल्या व्यवसायाची जाहिरात आजच द्या!
लाखो लोकांपर्यंत पोहोचवा!
दुकाने • हॉस्पिटल • क्लासेस • हॉटेल • स्थानिक व्यवसाय
✅ जाहिरातीसाठी WhatsApp वर संपर्क करा
KattaNews.in
KattaNews जाहिरात KattaNews जाहिरात सेवा
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

‘शासनाचं आवतन म्हणजे जेवण वाढल्याशिवाय खरं नाही’; साखरखेर्डा तालुका मागणीवर डॉ. राजेंद्र शिंगणे स्पष्टच बोलले

On: October 15, 2026 3:16 PM
Follow Us:
साखरखेर्डा तालुका मागणीवर बोलताना माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगण
साखरखेर्डा  : समाधान सरकटे 

साखरखेर्डा तालुका निर्मितीची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, या मागणीसाठी आजही पाठपुरावा सुरूच राहणार आहे, अशी स्पष्ट भूमिका माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी मांडली. शासनाकडून अनेकदा मागण्या विचाराधीन असल्याचे मोघम उत्तर दिले जाते; मात्र प्रत्यक्ष निर्णय झाल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवता येत नाही, अशा शब्दांत त्यांनी शासनाच्या कार्यपद्धतीवर भाष्य केले. साखरखेर्डा येथे शिवशक्ती स्पोर्ट्स क्लबच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

जिजामाता विद्यालयाचे सचिव पंजाबराव हाडे यांनी सुरू केलेल्या शिवशक्ती स्पोर्ट्स क्लबचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना डॉ. शिंगणे म्हणाले की, शासनात काम करताना विविध मागण्यांबाबत कशा प्रकारे उत्तरे दिली जातात, याचा अनुभव त्यांनाही आहे. साखरखेर्डा तालुका निर्मितीसाठी सातत्याने पाठपुरावा करूनही विचाराधीन असल्याचे उत्तर मिळत गेले. त्यामुळे शासनाचे आवतन म्हणजे प्रत्यक्ष जेवण वाढल्याशिवाय काही खरं नाही, अशी परिस्थिती असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात तालुका निर्मिती होईल, त्यावेळी साखरखेर्ड्याची मागणी पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त करत या प्रश्नासाठी पाठपुरावा सुरूच ठेवण्याची ग्वाही त्यांनी दिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, माजी आमदार डॉ. संजय रायमुलकर, माजी समाजकल्याण सभापती बाबुराव मोरे, माजी कृषी सभापती दिनकरराव देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उमेश शेजूळ, माजी सभापती तेजराव बापू देशमुख, अनिल तुपकर, सुरेश तुपकर, शिवसेना नेते ऋषिकेश जाधव, मेहकरचे नगराध्यक्ष किशोर गारोळे, जिजामाता विद्यालयाचे संचालक ललित अग्रवाल, पंढरीनाथ टेकाळे, अमित जाधव आणि बबनराव रिंढे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधत प्रतिकूल परिस्थितीत खचून न जाता तिचा सामना करण्याचे आवाहन केले. पावसाचे प्रमाण अत्यल्प असतानाही शेतकऱ्यांनी धीर सोडू नये. आत्महत्या हा मार्ग नसून परिस्थितीशी लढा देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी अडचणींचा सामना करताना एकटे असल्याचे समजू नये, आम्ही तुमच्या सोबत आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कर्ज किंवा पैशांच्या मागणीसाठी कोणी त्रास देत असेल, तर घाबरून न जाता मदतीसाठी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.

ग्रामीण भागातील युवकांना खेळण्यासाठी पुरेशी मैदाने आणि सुविधा उपलब्ध होत नसल्याची बाब माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी अधोरेखित केली. अशा परिस्थितीत साखरखेर्डा येथे शिवशक्ती स्पोर्ट्स क्लब सुरू करून युवकांना क्रीडा क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्याचा उपक्रम अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण हाडे यांनी केले, तर संचालन अजीम नवाज राही यांनी केले. साखरखेर्डा परिसरातील तालुका निर्मितीच्या मागणीसोबतच ग्रामीण युवकांना क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मुद्द्यांमुळे या कार्यक्रमाला महत्त्व प्राप्त झाले.

📲 बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या बातम्या सर्वप्रथम मिळवा!

कट्टा न्यूजचा WhatsApp ग्रुप जॉइन करा आणि महत्त्वाच्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवा.

✅ WhatsApp Group Join करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचकांसाठी महत्त्वाच्या बातम्या

“मुख्यमंत्र्यांच्या नावाने वसुली होतेय?”; “आरोप खोटा ठरला तर आमदारकीचा राजीनामा देईन” बुलडाण्यातील भाजप-शिवसेना संघर्षात संजय गायकवाडांचा मोठा दावा

दुष्काळाच्या छायेत बुलढाणा जिल्हा परिषदेला नवे CEO; गुलाबराव खरात यांची बदली, भालचंद्र चव्हाण यांची नियुक्ती

साखरखेर्डा अपर तहसीलदार कार्यालय अखेर सुरू होणार, महाराष्ट्र शासनाचा निर्णय, नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण

ही बातमी साखरखेर्डा परिसरातील नागरिकांपर्यंत पोहोचवा.

बातमी शेअर करा आणि स्थानिक घडामोडींसाठी KattaNews.in ला भेट देत राहा.

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

चिखली पोलिसांनी गुजरातमधील वाकानेर येथून फसवणुकीच्या गुन्ह्यातील ४० वर्षीय आरोपीला अटक केली

चिखली पोलिसांची गुजरातमध्ये कारवाई; फसवणुकीच्या गुन्ह्यातील ४० वर्षीय आरोपीला वाकानेरमधून अटक

लोणारमध्ये कथित अवैध सावकारीप्रकरणी तीन ठिकाणी सहकार विभागाची कारवाई

Lonar News: लोणारमध्ये कथित अवैध सावकारीप्रकरणी ३ घरांवर छापे; कोरे चेक आणि खरेदीखते जप्त

बुलढाणा जिल्हा परिषद CEO भालचंद्र चव्हाण नियुक्ती.

दुष्काळाच्या छायेत बुलढाणा जिल्हा परिषदेला नवे CEO; गुलाबराव खरात यांची बदली, भालचंद्र चव्हाण यांची नियुक्ती

देऊळगाव राजा येथील गॅरेजमधून चोरीला गेलेला दहा चाकी टाटा ट्रक

Deulgaon Raja News: देऊळगाव राजात गॅरेजमधून दोन लाखांचा दहा चाकी ट्रक रातोरात चोरीला; पोलिसांत गुन्हा दाखल

देऊळगाव राजा हिंसाचार प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेबाबत उपस्थित प्रश्न

देऊळगाव राजा हिंसाचार प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; ठाणेदारांच्या कार्यवाहीची चौकशी होणार?

शेतातून सहकाऱ्यांशी संवाद साधताना अभिजीत दीपके

अभिजीत दीपके पोलिसांना चकवा देत शेतात पोहोचले; आंदोलनाची पुढील दिशा व्हिडिओ कॉलवरून ठरवली

Leave a comment