हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

साखरखेर्डा येथे रक्तदान शिबिरात ५१ युवकांचा सहभाग! जगद्गुरु रामानंदाचार्य संप्रदायाचा प्रेरणादायी उपक्रम

On: January 12, 2026 4:35 PM
Follow Us:
साखरखेर्डा येथे आयोजित रक्तदान शिबिरात युवक रक्तदान करताना
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

साखरखेर्डा | १२ जानेवारी २०२६

साखरखेर्डा येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असून या रक्तदान शिबिरात ५१ युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
जगद्गुरु रामानंदाचार्य संप्रदाय समितीच्या माध्यमातून राबविण्यात आलेले हे रक्तदान शिबिर
राष्ट्रीय कार्यात मोलाचे योगदान देणारे ठरले आहे.
साखरखेर्डा रक्तदान शिबिरातून अनेक रुग्णांना नवसंजीवनी मिळणार असून
रक्तदान शिबिर हा सामाजिक जाणीव जपणारा उपक्रम असल्याचे यावेळी दिसून आले.

हे रक्तदान शिबिर जगद्गुरु रामानंदाचार्य संप्रदाय सिंदखेडराजा तालुका सेवा समितीच्या वतीने
येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, साखरखेर्डा येथे आयोजित करण्यात आले होते.
सकाळी ९ वाजता सरपंच सौ. ज्योती अमित जाधव यांच्या शुभहस्ते व
ठाणेदार गजानन करेवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन झाले.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल परिहार, डॉ. प्रशांत भालेराव,
माजी मुख्याध्यापक रमेश ठोसरे, माजी प्राचार्य डी. एन. पांचाळ,
पत्रकार अशोक इंगळे, तालुका अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर दसरे,
सेवाकेंद्र अध्यक्ष रामेश्वर दानवे, ब्लॅक कमांडो रमेश इंगळे,
तसेच महिला तालुका प्रमुख अनिताताई झोरे, कल्पनाताई दानवे,
मंदाकिनीताई दसरे, ज्योतीताई इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.

रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असून एका रक्तदात्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात,
या उदात्त हेतूने जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने
दरवर्षीप्रमाणे यंदाही ४ ते १८ जानेवारी २०२६ या कालावधीत
महाकुंभ उपक्रमांतर्गत रुग्णांना विनामूल्य रक्तपुरवठा करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे.

ठाणेदार गजानन करेवाड यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,
अपघातग्रस्त, गर्भवती माता, अॅनिमिया, सिकलसेल, थॅलेसिमिया,
ब्लड कॅन्सर, किडनी फेल्युअर यांसारख्या गंभीर आजारांमध्ये
रक्तदातेच रुग्णांचे खरे देवदूत ठरतात.

या शिबिरात एकूण ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते,
व्यापारी व शेतकरी युवकांचा समावेश होता.
प्रत्येक रक्तदात्यास प्रमाणपत्र, अल्पोपहार तसेच वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

👉 अशीच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in फॉलो करा

सामाजिक, आरोग्य, राजकीय आणि ग्रामीण भागातील अपडेट्स सर्वात आधी वाचा.

 

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मलकापूर पांगरा येथे ट्रॅक्टर अपघातात युवकाचा मृत्यू

मलकापूर पांगरा येथे भीषण अपघात! धावत्या ट्रॅक्टरवरून तोल जाऊन युवक चाकाखाली; मदत मिळण्याआधीच मृत्यू?

सिंदखेडराजा येथे प्रशिक्षणादरम्यान उपाशी राहिलेल्या आशा सेविकांचे आंदोलन

सिंदखेडराजात प्रशासनाचा गोंधळ! प्रशिक्षणात शेकडो आशा सेविका उपाशी; एक सेविका बेशुद्ध पडून हात फ्रॅक्चर

मोताळा येथे क्रेन ऑपरेटरचा संशयास्पद मृत्यू, हातावर लिहिलेला शेवटचा संदेश

मोताळ्यात हृदयद्रावक घटना! क्रेन ऑपरेटरने घेतला टोकाचा निर्णय; हातावर लिहिलेला शेवटचा संदेश वाचून धक्का

Buldhana district gram panchayat by election 59 villages voting on 28 April 2026

बुलढाणा जिल्ह्यात 59 ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुका जाहीर; 28 एप्रिलला मतदान, 17 मार्चपासून आचारसंहिता लागू

Mehkar Nagar Parishad court notice over construction despite ban order

मनाई हुकूम असतानाही बांधकाम; मेहकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व ठाणेदारांना कोर्टाची नोटीस

Maharashtra government decision to sell kerosene at petrol pumps due to LPG gas shortage

गॅस टंचाईमुळे मोठा निर्णय! आता पेट्रोल पंपांवर ‘केरोसीन’ मिळणार; विधानसभेत छगन भुजबळांची घोषणा

Leave a Comment