जिल्हा प्रतिनिधी- नारायणराव आरू पाटील
वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील रिठद ते पार्डी तिखे हा महत्वाचा प्रजिमा ५९ क्रमांकाचा रस्ता सध्या अत्यंत दुरावस्थेत असून या रस्त्याच्या खडीकरण, डांबरीकरण व मजबुतीकरणासाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी खासदार संजय भाऊ देशमुख यांच्या ध्यानात निवेदनाद्वारे आणण्यात आली.
दिनांक ५ नोव्हेंबर २०२५ रोजी वाशीम सर्किट हाऊस येथे झालेल्या बैठकीदरम्यान रिसोड शिवसेना (ऊ.बा.ठा.) तालुकाप्रमुख नारायण आरू यांनी हे निवेदन सादर केले.
सध्या या रस्त्यावर अनेक ठिकाणी खोल खड्डे पडल्यामुळे शेतजमिनींकडे जाणारा मार्ग अत्यंत किचकट झाला आहे. फवारणी, मशागत, काढणी यासाठी शेतमाल वाहतूक करताना शेतकऱ्यांना मोठ्याप्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शेतातील उत्पन्न बाजारपेठेत नेण्यासाठी याच मार्गावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होताना दिसत आहे. काही ठिकाणी पूल बांधण्याची देखील आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
हे पण वाचा.
रिठद येथे धक्कादायक प्रकार! दिवसा ढवळ्या शेताजवळून मोटरसायकल चोरी.
हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभाग रिसोड यांच्या अखत्यारीत असून बजेटमध्ये निधीची तरतूद तातडीने करावी, अशी मागणी या वेळी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली.
रस्त्याच्या दुरुस्तीमुळे :
- शेतमाल वाहतूक सुलभ होईल
- खर्चात बचत होईल
- वाहनांची हानी टळेल
- शेतकऱ्यांची दैनंदिन गैरसोय कमी होईल
मागणीची दखल घेऊन या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण तात्काळ करण्यात यावे, अशी अपेक्षा नागरिक व शेतकरीवर्गातून व्यक्त होत आहे.
हे पण वाचा.
जलसंपदाचे अधिकारी एसीत मस्त, पण शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर! रिसोड तालुक्यात संतापाची लाट.










