हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

रिसोड येथे बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे महिला बचत गट कर्जवाटप मेळावा; महिलांच्या स्वावलंबनाला बळ

On: December 26, 2025 1:46 PM
Follow Us:
रिसोड येथे बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे महिला बचत गट कर्जवाटप मेळावा संपन्न
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

नारायणराव आरु पाटील/वाशिम जिल्हा प्रतिनिधी 

रिसोड महिला बचत गट कर्जवाटप या उपक्रमांतर्गत रिसोड येथे बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या वतीने महिला बचत गट कर्जवाटप मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. रिसोड महिला बचत गट कर्जवाटप उपक्रमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा महत्त्वाचा संदेश देण्यात आला. बँक ऑफ महाराष्ट्र रिसोड शाखेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात ४४ महिला बचत गटांना सुमारे १ कोटी ३० लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले.दिनांक २२ डिसेंबर २०२५ रोजी रिसोड तहसील कार्यालयातील मुख्य सभागृहात हा कर्जवाटप मेळावा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून रिसोड पोलीस स्टेशनचे निरीक्षक रामेश्वर चव्हाण, नाबार्डचे डी.डी.एम. शंकर कोकडवार, जिल्हा समन्वयक पी.एम.एफ.एम.ई. वाशिमचे गोपाल मुठाळ, माविम कार्यक्रम अधिकारी प्रांजली वसाके, बँक ऑफ महाराष्ट्र अकोला अंचलचे जी.एम. श्रीधर आदी मान्यवर उपस्थित होते.अध्यक्षीय भाषणात तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी बचत गटांनी आर्थिक शिस्त पाळण्याचे आवाहन केले. बचत गटातील व्यवहार स्वतः महिलांनीच करावेत, कोणत्याही दलालावर विश्वास ठेवू नये, तसेच कर्जाचा वापर उद्योग-व्यवसायासाठी करून कुटुंबाच्या प्रगतीसाठी करावा, असे त्यांनी स्पष्ट केले.रिसोड पोलीस स्टेशनचे निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांनी महिलांना सायबर फसवणूक, मोबाईल संदेशांचा गैरवापर आणि आर्थिक फसवणुकीपासून सावध राहण्याचा सल्ला दिला. बँक कधीही फोनवर वैयक्तिक माहिती मागत नाही, त्यामुळे अशा कॉल्सपासून दूर राहावे, असे त्यांनी सांगितले.जिल्हा समन्वयक गोपाल मुठाळ यांनी केंद्र शासनाच्या सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत महिला बचत गटांना मिळणाऱ्या ३५ टक्के अनुदानाची माहिती दिली. वाशिम जिल्ह्याने या योजनेत राज्यात उच्चांक गाठल्याचे त्यांनी नमूद केले.

नाबार्डचे डी.डी.एम. शंकर कोकडवार यांनी बचत गट चळवळीचा इतिहास सांगत महिलांनी कर्जाचा योग्य वापर करून उद्योग उभारावेत, तसेच प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, अटल पेन्शन योजना, सुकन्या समृद्धी योजना यांसारख्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

अकोला अंचलचे जी.एम. श्रीधर यांनी पुढील सहा महिन्यांत रिसोड तालुक्यात २०० महिला बचत गटांना कर्ज पुरवठ्याचे उद्दिष्ट जाहीर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाखा प्रबंधक सचिन मैंदकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रदीप तायडे व अभिषेक माळेकर यांनी केले.

हे पण वाचा..

हे आवश्यक करा…

अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि ग्रामीण भागातील महत्त्वाच्या बातम्यांसाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment