हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

रिसोड बसस्टँडवर ५२०० रुपये चोरी; पोलिसांचा विजेगती तपास — पाकीटमार तासाभरात ताब्यात! | Risod Crime News

On: November 22, 2025 10:15 AM
Follow Us:
Risod Crime News: रिसोड बसस्टँडवरील पाकीटमारी प्रकरण, पोलिसांची कारवाई
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

वाशिम जिल्हा प्रतिनिधी/नारायणराव आरु पाटील 

Risod Crime News: रिसोड बसस्टँडवर पाच हजार दोनशे रुपयांची चोरी झाल्याची घटना घडल्यानंतर रिसोड पोलिसांनी विजेगतीने तपास लावत अवघ्या काही तासातच पाकीटमाराला अटक करून रोख रक्कम जप्त केली. स्थानिक नागरिकांकडून या जलद कारवाईचे कौतुक होत आहे.शिवाजी बळीराम जाधव (वय ५४, रा. पानकन्हेरगाव, ता. सेनगाव, जि. हिंगोली) हे आपल्या मेहुणीकरीता कपडे खरेदी करण्यासाठी रिसोड येथे आले होते.
Risod Crime News दुपारी २.३० च्या सुमारास रिसोड–हिंगोली बसमध्ये चढताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या पॅन्टच्या खिशातील ५२०० रुपये काढून चोरून नेले.फिर्याद नोंद होताच रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांनी डीबी पथकाला तपासाच्या सुचना देताच तपास वेगाने सुरू करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि आधुनिकी पद्धतींचा वापर करून आरोपीचा शोध घेण्यात आला.त्यात सैय्यद जुनैद सैय्यद अब्दुल कदीर (वय २३, रा. आजम कॉलनी, हिंगोली) हा संशयित युवक ओळखून त्यास बसस्टँड परिसरातून ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी चोरी केलेली पूर्ण ५२०० रुपयांची रोकड जप्त केली.या कार्यवाहीत पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले, पोहेकॉ रमेश गोडघासे, पोलीस अंमलदार विनोद घनवट, परमेश्वर भोणे, विनोद मस्के, सुधाकर सोन्नर यांनी सहभाग घेतला. संपूर्ण तपास मा. पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक लता फड, सहायक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.


🔗 Related News


📢 वाचकांसाठी संदेश

KattaNews.in — महाराष्ट्रातील विश्वासार्ह आणि गतिमान स्थानिक न्यूज पोर्टल!
वाशिम,बुलढाणा आणि विदर्भासह महाराष्ट्रातील ताज्या Crime अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी KattaNews.in ला भेट द्या.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मलकापूर पांगरा येथे ट्रॅक्टर अपघातात युवकाचा मृत्यू

मलकापूर पांगरा येथे भीषण अपघात! धावत्या ट्रॅक्टरवरून तोल जाऊन युवक चाकाखाली; मदत मिळण्याआधीच मृत्यू?

सिंदखेडराजा येथे प्रशिक्षणादरम्यान उपाशी राहिलेल्या आशा सेविकांचे आंदोलन

सिंदखेडराजात प्रशासनाचा गोंधळ! प्रशिक्षणात शेकडो आशा सेविका उपाशी; एक सेविका बेशुद्ध पडून हात फ्रॅक्चर

मोताळा येथे क्रेन ऑपरेटरचा संशयास्पद मृत्यू, हातावर लिहिलेला शेवटचा संदेश

मोताळ्यात हृदयद्रावक घटना! क्रेन ऑपरेटरने घेतला टोकाचा निर्णय; हातावर लिहिलेला शेवटचा संदेश वाचून धक्का

Buldhana district gram panchayat by election 59 villages voting on 28 April 2026

बुलढाणा जिल्ह्यात 59 ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुका जाहीर; 28 एप्रिलला मतदान, 17 मार्चपासून आचारसंहिता लागू

Mehkar Nagar Parishad court notice over construction despite ban order

मनाई हुकूम असतानाही बांधकाम; मेहकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व ठाणेदारांना कोर्टाची नोटीस

Maharashtra government decision to sell kerosene at petrol pumps due to LPG gas shortage

गॅस टंचाईमुळे मोठा निर्णय! आता पेट्रोल पंपांवर ‘केरोसीन’ मिळणार; विधानसभेत छगन भुजबळांची घोषणा

Leave a Comment