कट्टा न्यूज नेटवर्क
समृद्धी महामार्ग अपघात प्रकरणात मोठी बातमी समोर आली असून, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या कारचा अपघात वाशिम जिल्ह्यातील मालेगाव नजीक झाला आहे. या समृद्धी महामार्ग अपघातात मंत्री प्रतापराव जाधव कारमध्ये नसले तरी त्यांच्या कारमधील तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान, अपघात नेमका कसा झाला, वाहनाचा वेग अधिक होता की तांत्रिक बिघाड झाला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून अपघाताच्या कारणांचा सखोल तपास सुरू आहे.
हे पण वाचा..
मेहकर नगरपालिकेत ‘सत्तासंघर्ष’ पेटला; सत्कार सोहळ्यावरून काँग्रेस-शिंदेसेनेची नाराजी.
समृद्धी महामार्गावर वारंवार होणारे अपघात पुन्हा एकदा महामार्गावरील सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न उपस्थित करत आहेत. या घटनेमुळे राजकीय वर्तुळातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
🔴 Breaking Updates साठी Kattanews.in ला Follow करा
राजकारण, अपघात, गुन्हेगारी व स्थानिक बातम्यांचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या.












