शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! पीक विमा खात्यात जमा होण्यास सुरुवात…खरीप आणि रब्बी kharip rabbi हंगामातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव prataprav jadhav, राज्याची कृषीमंत्री धनंजय मुंढेdhanajay mundhe व पीक विमा कंपनी झालेल्या बैठकीतील निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. जिल्ह्यातील २७८५४७ शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ होणार आहे जिल्ह्यात २०२२-२३ व २०२३- २४ यावर्षी खरीप आणि रब्बी हंगामामध्ये अतिवृष्टी होवून शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पैसे मिळण्याच्या दृष्टिकोनातून गेल्या महिन्यात राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंढे dhanajay mundhe व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पीकविमा कंपनीचे प्रतिनिधी यांच्या बैठक झाली होती.
यासंदर्भात पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना निर्देशित करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात या नुकसान भरपाईचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. यामध्ये सन २०२३-२४ खरीप हंगामांतर्गत २४३१४६ शेतकऱ्यांना २३३.६५ कोटी रुपये रब्बी हंगामात २५६१ शेतक ऱ्यांना १.६ कोटी रुपये, २०२३ २४ खरीप हंगामा अंतर्गत २२१५५८ शेतकऱ्यांना १३८.८४ कोटी रुपये आणि रब्बी हंगामांतर्गत ५६९८९ शेतकऱ्यांना १२५.२३ कोटी रुपये, असे जिल्ह्यातील २७८५४७ शेतकऱ्यांच्या खात्या मध्ये २६४.०७ कोटी जमा होणार आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्याची कारवाई सुरू झाली आहे.