
khamgaon : पतीसोबत वाद झाल्याने रागाच्या भरात घरुन निघून गेलेल्या विवाहितेचा मृतदेह शेलोडी shelodi शिवारातील पाझर तलावात आढळून आला आहे. तालुक्यातील ‘टेंभूर्णा’ शिवारातील गजानन मुकुंदा काळे यांच्या शेतात राहत असलेल्या मिरा गजानन बामणे वय २५ या विवाहितेचा पतीसोबत शाब्दीक वाद झाला होता. यामुळे सदर विवाहिता रागाच्या भरात घरुन निघून गेली होती. दरम्यान तिचा शोध घेतला असता शेलोडी शिवारातील पाझर तलावात मीरा बामणे meera bamneहिचा मृतदेह मिळून आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.