वाशिम जिल्हा प्रतिनिधी : नारायणराव आरू पाटील
पांदण रस्ते शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने ते मार्गी लावण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी पुढाकार घ्यावा, असे स्पष्ट मत आमदार अमित झनक यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्री पांदण रस्ते शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय या दृष्टीने शासन सकारात्मक असून योजना प्रभावीपणे राबवली जात आहे.
पांदण रस्ते शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने कोणतीही अडचण शेतकऱ्यांवर येऊ देणार नाही, असा विश्वास त्यांनी दिला.रिसोड येथील तहसील कार्यालयात १ जानेवारी रोजी मुख्यमंत्री पांदण रस्ता योजना व घरकुल योजनांबाबत आयोजित आढावा बैठकीत आमदार अमित झनक बोलत होते. या बैठकीला उपविभागीय अधिकारी तथा सचिव वैशाली देवकर, तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर, ठाणेदार रामेश्वर चव्हाण, गटविकास अधिकारी खुळे, कृषी अधिकारी मगनदास तावरे, सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अभियंता अभिषेक देशमुख यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.बैठकीदरम्यान पांदण रस्त्यांच्या कामांतील अडथळे, मोजणी व अभिलेख अद्ययावत करणे, घरकुल लाभार्थ्यांच्या प्रकरणांचा त्वरित निपटारा तसेच विभागांमधील समन्वय वाढविण्याबाबत ठोस सूचना देण्यात आल्या. ग्रामीण भागातील शेतकरी व गरजू कुटुंबांना योजनांचा थेट लाभ मिळावा, यावर भर देण्यात आला.हे पण वाचा..
अधिकारी सद्बुद्धीसाठी 101 नारळ! वाशिम पंचायत समितीसमोर शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन.
यापुढे कोणताही पांदण रस्ता मोकळा करताना मोजणीसाठी शेतकऱ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तसेच बंदोबस्तासाठीही पैसे द्यावे लागणार नाहीत. शक्य तिथे प्रश्न ग्रामपंचायत स्तरावर सोडवावेत, अन्यथा महसूल व पोलीस प्रशासन संपूर्ण सहकार्य करेल, असे आमदार अमित झनक यांनी स्पष्ट केले.
या आढावा बैठकीमुळे पांदण रस्ते व घरकुल योजनांच्या कामांना गती मिळेल, असा विश्वास उपस्थित अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
👉 आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी वाचण्यासाठी
Kattanews.in ला Follow करा.
ग्रामीण विकास, शेतकरी प्रश्न आणि ताज्या राजकीय बातम्यांसाठी आमच्यासोबत रहा.










