प्रवासी गाढ झोपेत असताना दोन्ही बस क्षणार्धात नदीत कोसळल्या.

Nepal bus accident
Nepal bus accident

 

प्रवासी गाढ झोपेत असताना क्षणात बस नदीमध्ये कोसळल्या मुसळधार पावसामुळे नेपाळमध्ये झालेल्या भूस्खलनात दोन बसेस त्रिशुली नदीत वाहून गेल्या. पहाटे प्रवासी साखरझोपेत असताना ही धक्कादायक घटना घडली. दोन्ही बसमध्ये मिळून ६५ प्रवासी होते. त्यापैकी ७ भारतीय प्रवासी आणि एका बसचालकाचा मृत्यू झाला असून, ५० पेक्षा जास्त लोक बेपत्ता आहेत. तीन प्रवाशांनी बसमधून उडी मारल्यामुळे त्यांचे प्राण वाचले. नेपाळ सरकारने बचावकार्य सुरू केले आहे.

 

 

 

अँजेल कंपनीची एक बस काठमांडूकडे, तर गणपती डिलक्स कंपनीची बस काठमांडू येथून गौर येथे जात होती. काठमांडूकडे जाणाऱ्या बसमध्ये २४, तर गौर येथे जाणाऱ्या बसमध्ये ४१ प्रवासी होते. गणपती डिलक्सच्या बसमधून तीन प्रवाशांनी उडी मारल्यामुळे त्यांचे प्राण वाचले. या बसमध्ये सात भारतीय नागरिक प्रवास करीत होते. त्यांचा मृत्यू झाला. नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले.