
crime : बीड beed जिल्ह्यातील नेकनूर येथे मांसाहार देण्याचे आमिष दाखवून दहा वर्षांच्या चिमुकलीवर बाप-लेकासह तिघांनी ‘अत्याचार’ केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तिघांविरोधात नेकनूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर लगेच तीनही आरोपींना शनिवारी रात्री उशिरा अटक करण्यात आलेली आहे. अत्याचाराची ही घटना ३ ऑगस्टपूर्वी घडलेली आहे; परंतु आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे त्या पीडित मुलीने झालेला प्रकार कोणालाही सांगितला नाही.
प्रकार कसा समोर आला ?
पीडित मुलगी बाहेरगावी शिकायला असते. तेथील शाळेमध्ये गुड टच, बॅड टच याबद्दल मुलींना शिकवले जात होते. शिक्षिका मुलींना शाळेत शिकवत असताना पीडित मुलगी अचानक रडू लागली. ती रडत असल्याने शिक्षिकेने तिला जवळ घेत विश्वासाने विचारले. त्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगितला. तिला मांसाहार आणून देतो, असे म्हणून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. तसेच तिने हा प्रकार कोणाला सांगू नको, म्हणून तिच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली