Amaravti : अवघ्या १२ वर्षीय मुलींवर काका-पुतन्याकडून बलत्कार !

Amaravti

Amaravti : दोन अल्पवयीन मुलींवर  बलात्कार करून तिसऱ्या अल्पवयीन मुलीची लैंगिक छेड काढत विनयभंग करण्यात आला. ही धक्कादायक घटना नांदगाव खंडेश्वर nandgaon khandeshwar तालुक्यातील एका गावात ११ जुलै रोजी उघड झाली. याप्रकरणी ५० व २७ वर्षीय अशा दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, ते सख्खे काका-पुतणे kaka-putne आहेत. दोन्ही बलात्कार पीडिता या अवघ्या १२ वर्षांच्या, तर विनयभंग झालेली चिमुरडी ही दहा वर्षांची आहे. त्या तिघीही परस्परांच्या चुलतबहिणी आहेत.

 

 

 

याप्रकरणी चाइल्डलाइन हेल्पलाइनच्या सुपरवायझर असलेल्या महिलेच्या तक्रारीवरून मंगरूळ चव्हाळा पोलिसांनी ११ जुलै रोजी रात्री १०.१२च्या सुमारास आरोपी मारोती maroti  (२७) व सहदेव sahdev  (५०) यांच्याविरुद्ध बलात्कार, विनयभंग व पोक्सोअन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दोन्ही आरोपींना शुक्रवारी अटक करण्यात आली. १ जुलै २०२३ ते ३१ मार्च २०२४ दरम्यान ती लैंगिक छळमालिका चालली.

 

 

 

या घटनेची गोपनीय माहिती चाइल्डलाइनला childline मिळाली होती. त्यांनी संपूर्ण चौकशी करून त्याबाबत मंगरूळ चव्हाळा पोलिस ठाण्याला त्याबाबत माहिती दिली. आरोपी सहदेव व मारोती या काका-पुतण्याने दोन्ही १२ वर्षीय बालिकांवर शारीरिक अत्याचार केला. तर मारोतीने maroti पीडिताच्या १० वर्षीय चुलतबहिणीला नको त्या ठिकाणी स्पर्श करून तिचा विनयभंग केला.