हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

PG करणाऱ्या डॉक्टरची नागपुरात आत्महत्या; हॉटेलमध्ये संपवले आयुष्य, वडिलांचा वारंवार मुलाला फोन

On: February 6, 2026 8:26 AM
Follow Us:
नागपूरमध्ये PG करणाऱ्या तरुण डॉक्टरची आत्महत्या – ब्रेकिंग न्यूज
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

चिखली |६ फेब्रुवारी २०२६

नागपूरमध्ये PG करणाऱ्या एका तरुण डॉक्टरच्या आत्महत्येने संपूर्ण वैद्यकीय वर्तुळ हादरून गेले आहे. नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) नेत्ररोग विभागातील २६ वर्षीय निवासी डॉक्टरने सोमवारी सकाळी शहरातील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ऋत्विक सागर ठाकूर (वय २६) असे मृत डॉक्टरचे नाव असून तो मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील रहिवासी होता. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी नुकताच नागपूर मेडिकलमध्ये दाखल झालेल्या या तरुण डॉक्टरच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सहकारी डॉक्टरांमध्येही तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ऋत्विक ठाकूर याने मुंबईतील सेठ जी.एस. मेडिकल कॉलेज व केईएम रुग्णालयातून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले होते. दोन्ही पालक डॉक्टर असलेल्या ऋत्विकला नागपूर मेडिकल कॉलेजच्या नेत्ररोग विभागात पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश मिळाला होता. तो २७ जानेवारी २०२६ रोजीच विभागप्रमुख डॉ. दिलीप उमरे यांच्या युनिटमध्ये रुजू झाला होता.

कॉलेजजवळील गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये ऋत्विक वास्तव्यास होता. सोमवारी तो कॉलेजला गैरहजर राहिल्याने विभागप्रमुखांनी त्याच्या वडिलांशी संपर्क साधला. वडिलांनी वारंवार फोन करूनही मुलाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे हॉटेल व्यवस्थापनाशी संपर्क साधण्यात आला.

हॉटेल कर्मचाऱ्यांनी खोलीचा दरवाजा ठोठावला; मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. संशय बळावल्यानंतर गणेशपेठ पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता ऋत्विक ठाकूर यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले.

प्राथमिक तपासात कोणतीही सुसाइड नोट आढळून आलेली नाही. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून गणेशपेठ पोलीस विविध अंगांनी तपास करीत आहेत. तरुण डॉक्टरच्या मृत्यूने वैद्यकीय क्षेत्रातील मानसिक ताणतणाव आणि दबाव पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


👉 वाचकांसाठी आवाहन :
जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी मानसिक तणावाखाली असेल, तर मदत घेण्यास अजिबात संकोच करू नका. वेळेवर संवाद आणि आधार जीवन वाचवू शकतो.


Related News

 

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment