हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

मोहाडी शिवारात बिबट्याचा थरार! नीलगाईवर हल्ला; मादी बिबट्या व दोन पिल्लांचा वावर

On: March 16, 2026 5:13 PM
Follow Us:
मोहाडी शिवारात बिबट्याचा हल्ला, नीलगाई जखमी
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

साखरखेर्डा |१६ मार्च २०२६

येथून जवळच असलेल्या मोहाडी शिवारात मागील चार दिवसांपासून बिबट्याच्या वावरामुळे परिसरातील शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. १५ मार्च रोजी सकाळी सुमारे १० वाजता बिबट्याने एका नीलगाईवर (रोही) हल्ला करून तिला जखमी केल्याची घटना घडली.

नीलगाईचा मोठ्याने ओरडण्याचा आवाज ऐकून शेतात काम करीत असलेले शेतकरी गजानन बबन इंगळे आणि माजी सैनिक पुंजाजी इंगळे धावत गेले. तेव्हा एक मादी बिबट्या आणि तिची दोन पिल्ले यांनी नीलगाईवर हल्ला करून तिला जखमी केलेले त्यांनी पाहिले. बिबट्याने नीलगाईला जबड्यात पकडून ठेवले होते.

चार दिवसांपूर्वीही मोहाडी गावाजवळील तलाव परिसरात बिबट्याचा वावर दिसून आला होता. शेतकऱ्यांनी लाठ्या-काठ्या घेऊन त्याचा पाठलाग करून त्याला हाकलून लावले होते. उन्हाळा सुरू झाल्यामुळे अनेक ठिकाणी पाण्याचे साठे कमी होत असताना मोहाडी परिसरात पाझर तलाव आणि जवळच कोराडी धरण असल्याने वन्य प्राण्यांना पिण्याचे पाणी व हिरवा चारा उपलब्ध होत आहे.

यामुळे या भागात नीलगाई, हरणे, कोल्हे आदी वन्य प्राण्यांचा वावर वाढल्याचे दिसून येत आहे. त्याच कारणामुळे या प्राण्यांच्या शिकारीसाठी बिबट्यानेही आपला मोर्चा या परिसराकडे वळविल्याचा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत.

जखमी नीलगाईच्या पार्श्वभाग, पाठ आणि पोटावर नखांनी ओरबडल्याच्या जखमा होत्या. तसेच पोटावर मोठी जखम झाल्याने ती रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली दिसून आली.

मोहाडी परिसरात मागील चार दिवसांत बिबट्याच्या हल्ल्याची ही दुसरी घटना असून शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने या घटनांची गंभीर दखल घेऊन मोहाडी परिसरात तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

यापूर्वीही परिसरातील मौजे शिंदी येथे बिबट्याने माकडाची शिकार करून झाडावर लटकविले होते. तसेच शिंदी शिवारात दोन कुत्र्यांची शिकार केल्याच्या घटनाही घडल्या होत्या.


Related News

अधिक स्थानिक बातम्यांसाठी Kattanews.in ला भेट द्या.

 

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

सिंदखेडराजा तालुक्यातील वरोडी येथे महावितरणच्या वीज लाईनमुळे १ एकर गव्हाचे पीक जळून खाक

महावितरणच्या निष्काळजीपणाचा फटका! वरोडी येथे विधवा शेतकरी महिलेचा १ एकर गहू जळून खाक

Lonar atrocity crime news elderly woman assault Udanapur Buldhana

लोणारमध्ये संतापजनक प्रकार! ६० वर्षीय मातंग महिलेवर मारहाण व विनयभंग; रमेशआण्णा मुळेवर अॅट्रॉसिटी गुन्हा

पाण्यासाठी बलिदान देणारे कैलास नागरे प्रकरण; आमदार सिद्धार्थ खरात यांची नागरे कुटुंबाला भेट

पाण्यासाठी प्राण दिलेल्या कैलास नागरे यांच्या पत्नीला पोलीस पाटील करा; आमदार सिद्धार्थ खरातांचा सरकारला इशारा

massive fire at jaystambh chowk chikhli buldhana shops burnt in market area

चिखली हादरली! मध्यवर्ती जयस्तंभ चौकात भीषण आग; काही मिनिटांत 6 दुकाने जळून खाक

लिंगा साखरखेर्डा गावात पाण्याची तीव्र समस्या; धरण पायथ्याशी असूनही नागरिकांची पाण्यासाठी भटकंती

धरण पायथ्याशी गाव, तरीही पाण्यासाठी भटकंती! लिंगा (साखरखेर्डा) गावकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा

समृद्धी महामार्गावरील लोखंडी जाळी चोरीप्रकरणी तिघांना किनगाव राजा पोलिसांनी अटक

समृद्धी महामार्गावर लोखंडी जाळी चोरी प्रकरण उघड; मनसे तालुका अध्यक्षासह तिघे अटकेत, 2 लाखांचा मुद्देमाल जप्त

Leave a Comment