मेहकर/कट्टा न्यूज नेटवर्क
मेहकर हत्याकांडाने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. मेहकर शिक्षक कॉलनीतील दुहेरी हत्या प्रकरणात चारित्र्याच्या संशयातून पतीनेच झोपेत असलेल्या पत्नी व अवघ्या चार वर्षांच्या चिमुकल्याचा कुऱ्हाडीने निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मेहकर हत्याकांडामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांच्या भावना हेलावून गेल्या आहेत.
आरडाओरड ऐकून आरोपीची आई ताराबाई म्हस्के बाहेर आली असता घरातील रक्तरंजित दृश्य पाहून त्यांनी मदतीसाठी हाक दिली. शेजाऱ्यांच्या मदतीने रूपाली यांना प्रथम मेहकर ग्रामीण रुग्णालयात, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, आरोपीने चार वर्षीय रियांशला घरातील खोलीत बंद करून ठेवले होते. दरवाजा उघडल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत आढळलेल्या रियांशला रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे, ठाणेदार व्यंकटेश्वर आलेवार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सोमवारी अप्पर पोलीस अधीक्षकांनीही घटनास्थळाची पाहणी केली. आरोपीविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
हे पण वाचा..
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या कारमधील तीन जण गंभीर जखमी.
चार वर्षांचा निष्पाप रियांश या कौटुंबिक संशयाचा बळी ठरल्याने संपूर्ण मेहकर शहर हळहळले आहे. घरगुती संशय व मानसिक अस्थैर्याचे किती भीषण परिणाम होऊ शकतात, याचे हे विदारक उदाहरण ठरले आहे.
👉 अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in ला Follow करा.











