जळगाव जामोद | कट्टा न्यूज नेटवर्क
मानव विकास बस अपघातामुळे पुन्हा एकदा एसटी प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
जळगाव जामोद आगाराच्या मानव विकास मिशनची बस आयशर ट्रकला धडकल्याने
मानव विकास बस अपघातात बसमधील १२ विद्यार्थिनी जखमी झाल्या आहेत.
वारंवार घडणाऱ्या मानव विकास बस अपघात घटनांमुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
जळगाव जामोद आगारातून तालुक्यातील कुरणगाड येथे विद्यार्थिनींना घेऊन जाणारी
मानव विकास मिशनची बस क्रमांक MH 14 B 4539 ही जळगाव–आसलगाव मार्गावरील
सुपो जिनिंगजवळ सकाळी ११ वाजताच्या सुमारास उभ्या असलेल्या आयशर ट्रकला
पाठीमागून जोरदार धडकली.
बस चालक एस. आर. इंगळे यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
धडक इतकी भीषण होती की बसच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली.
अपघातात जखमी झालेल्या १२ विद्यार्थिनींना तातडीने
जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सुदैवाने सर्व विद्यार्थिनींना किरकोळ दुखापत झाली असून,
प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच आमदार डॉ. संजय कुटे यांच्या पत्नी
अपर्णाताई कुटे यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देत
जखमी विद्यार्थिनींची विचारपूस केली व त्यांना धीर दिला.
दरम्यान, एसटी बसची दयनीय अवस्था, वेळेवर देखभाल न होणे
आणि व्यवस्थापनातील निष्काळजीपणा यामुळे विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात येत असल्याचा
आरोप पालक व नागरिकांकडून केला जात आहे.
या घटनेनंतर मानव विकास मिशन बसच्या सुरक्षेची तातडीने तपासणी करण्याची
मागणी जोर धरू लागली आहे.
👉 KattaNews का वाचाल?
- महाराष्ट्रातील ब्रेकिंग व लोकल बातम्या सर्वात आधी
- 100% Verified आणि Ground Report News
- खात्रीशीर व अचूक बातमी.
- निर्भीड पत्रकारिता.
👉 Kattanews महाराष्ट्रातील नंबर १ ची लोकल न्यूज वेबसाईट फॉलो करा.
हे पण वाचा…











