हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

मालेगाव जिल्हा परिषद शाळेत माजी विद्यार्थ्यांचा ऐतिहासिक मेळावा! ८ दिवसांत CCTV व पिण्याच्या पाण्याची सुविधा देण्याची ग्वाही

On: January 7, 2026 8:09 AM
Follow Us:
मालेगाव जिल्हा परिषद शाळेत आयोजित माजी विद्यार्थी मेळाव्यात उपस्थित मान्यवर व शिक्षकवृंद
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

वाशिम जिल्हा प्रतिनिधी/नारायणराव आरु पाटील 

मालेगाव: मालेगाव येथे माजी विद्यार्थी मेळावा हा कार्यक्रम पीएमश्री जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक केंद्र शाळा, मालेगाव येथे दिनांक ३ जानेवारी २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. माजी विद्यार्थी मेळावा निमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला असून शाळेच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. हा उपक्रम शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी विद्यार्थी समितीचे अध्यक्ष डॉ. विवेकभाऊ माने होते. सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

कार्यक्रमात अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. अनुपमा देशमुख यांनी केले. त्यांनी शाळेतील Astrology Lab, Science Lab, Wi-Fi, RO पाणी, डिजिटल क्लासरूम, सुसज्ज शौचालय व परसबाग यांची माहिती दिली.

मुलींच्या सुरक्षेसाठी CCTV कॅमेरे व पिण्याच्या पाण्यासाठी बोअर सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन त्यांनी माजी विद्यार्थ्यांना केले. त्यावर माजी विद्यार्थी अरविंद बानाईतकरप्रवीण पाटील यांनी आठ दिवसांत व्यवस्था पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

नगर पंचायत नगराध्यक्ष ओमभाऊ खुरसडे यांनी पिण्याच्या पाण्याची सोय करून देण्याचे आश्वासन दिले, तर गणेश अहिर यांनी बोअर करून देण्याची स्वखुशीने तयारी दर्शवली.

अध्यक्षीय भाषणात डॉ. विवेकभाऊ माने यांनी शाळेतील बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. जिल्हा परिषद शाळांमधील सुविधा खासगी शाळांपेक्षा अधिक असल्याचे सांगत पालकांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत प्रवेश द्यावा, असे आवाहन केले.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित स्नेहभोजनाचा सर्व उपस्थितांनी आस्वाद घेतला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजूभाऊ कान्हेड, पत्रकार सुभाषभाऊ बळी, सर्व शिक्षकवृंद, मदतनीस व स्वयंयाकींनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. नेहा मांडवगडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रदीप खिल्लारे यांनी केले.

ही माहिती तेजराव पाटील (मराठा सेवा संघ, मालेगाव तालुकाध्यक्ष) यांनी दिली.


📌 Related News


👉 अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in ला भेट देत राहा.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment