हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

लोणारमध्ये बनावट कृषी औषधांचा पर्दाफाश; Syngenta कंपनीच्या नावाने शेतकऱ्यांची फसवणूक

On: February 5, 2026 4:20 PM
Follow Us:
लोणारमध्ये Syngenta कंपनीच्या नावाने विक्री होत असलेले बनावट Isabion कृषी औषध पोलिसांनी जप्त केले
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

लोणार | ५ फेब्रुवारी २०२६

लोणार शहरात बनावट कृषी औषध विक्रीचा अत्यंत गंभीर प्रकार उघडकीस आला असून Syngenta कंपनीच्या नावाने Isabion औषधाची बनावट विक्री केली जात असल्याने शेतकऱ्यांची थेट फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणामुळे शेतकऱ्यांच्या शेतीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून पोलिस व कृषी विभागाच्या संयुक्त कारवाईत ₹29,008 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई अरिहंत ऍग्रो कृषी सेवा केंद्र, लोणार येथे करण्यात आली. Syngenta कंपनीच्या Isabion (1 लिटर) या औषधांची बनावट पॅकेजिंग करून विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर संबंधित दुकानावर छापा टाकण्यात आला.या प्रकरणी सतीश तानाजी पिसाळ (वय 34), व्यवसाय – टू बडी कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड, नाशिक यांनी तक्रार दाखल केली असून त्यावरून सचिन सुभाषचंद्र बोरा (वय 47), रा. लोणार याच्याविरुद्ध प्रतिलिपी अधिकार अधिनियम 1957 (सुधारित 1984 व 1994) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छाप्यादरम्यान दुकानातील रॅक तसेच मागील स्टोअर रूममधून Isabion 1 लिटरच्या Syngenta कंपनीच्या 16 सिलबंद बाटल्या आढळून आल्या. प्रत्येकी किंमत ₹1,813 प्रमाणे एकूण ₹29,008 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

तपासणीदरम्यान या बाटल्या बनावट असल्याचे स्पष्ट झाले. मूळ बॉटलच्या तुलनेत बनावट बॉटलवरील लोगोचा रंग फिक्कट हिरवा, GTIN नंबरमधील तफावत, सिरीयल नंबरच्या फॉन्टमधील फरक तसेच झाकणाच्या रंगातही बदल आढळून आला.

या बनावट औषधांच्या विक्रीमुळे Syngenta कंपनीची प्रतिमा मलीन झाली असून शासनाच्या महसुलाचे नुकसान झाले आहे. तसेच अशा औषधांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक व शेतीविषयक मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धनंजय इंगळे करीत असून या कारवाईमुळे लोणार परिसरात बनावट कृषी औषध विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

प्रशासनाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, कृषी औषधे खरेदी करताना अधिकृत विक्रेते, कंपनीची सील, QR कोड व पॅकेजिंगची तपासणी करूनच औषधे खरेदी करावीत.


👉 शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना

बनावट कृषी औषधांमुळे उत्पादनात घट, पीक नुकसान आणि आर्थिक तोटा होऊ शकतो. त्यामुळे संशयास्पद औषध आढळल्यास त्वरित कृषी अधिकारी किंवा पोलिसांशी संपर्क साधावा.


📌 Related News


📢 हे आवश्यक करा

👉 अशा महत्त्वाच्या शेतकरी आणि ग्रामीण बातम्यांसाठी Kattanews.in ला दररोज भेट द्या.
👉 बातमी शेअर करून इतर शेतकऱ्यांनाही सतर्क करा.

 

विनायक कुटे

विनायक कुटे हे कट्टा न्यूज (Kattanews.in) चे प्रतिनिधी असून सामाजिक, प्रशासकीय आणि जनहिताच्या विषयांवर सातत्याने वार्तांकन करतात. नियमभंग, नागरिकांच्या समस्या, सार्वजनिक हिताशी संबंधित प्रश्न आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकणे, ही त्यांच्या पत्रकारितेची ओळख आहे. सत्य, अचूक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment