हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा मोठा निर्णय! सोशल मिडिया प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रदिप शेळके यांची निवड.

On: November 14, 2025 8:19 PM
Follow Us:
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

प्रवीण गरुडे/प्रतिनिधी

क्रांतिकारी शेतकरी संघटना आणि रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रदिप शेळके यांची क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या
सोशल मिडिया प्रदेशाध्यक्षपदी अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे.
ही निवड जाहीर होताच संघटनेमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रदिप शेळके हे रविकांत तुपकर यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष
रविकांत तुपकर यांच्या आदेशानुसार आणि संघटनेचे प्रदेशाध्यक्ष
राजीव कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही महत्वपूर्ण नियुक्ती जाहीर करण्यात आली.

✦ संघटनेने टाकलेल्या विश्वासाला प्रामाणिक उत्तर देण्याचा शेळके यांचा निर्धार

नियुक्ती स्वीकारल्यानंतर प्रतिक्रिया देताना प्रदिप शेळके यांनी सांगितले की,
“संघटनेने आणि रविकांतभाऊंनी माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे, तो सार्थ करण्यासाठी मी पूर्ण प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने काम करणार आहे.”

✦ संघटनेत उत्साहाचे वातावरण

प्रदेशभरातील कार्यकर्त्यांकडून प्रदिप शेळके यांच्या निवडीचे कौतुक करण्यात येत असून
सोशल मिडियावर अभिनंदन संदेशांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली डिजिटल माध्यमातून
संघटनेचे कार्य अधिक बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


📌 Related News


📢 Follow करा – Maharashtra No.1 विश्वसनीय डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म

“महाराष्ट्रातील नंबर 1 विश्वसनीय डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म — Katta News वर दररोजच्या अपडेट्ससाठी Follow करा!”

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment