हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

कोयाळी (बु.) भिसडे येथे शेतातील तुरीच्या गंजीला आग; शेतकऱ्याचे २.२५ लाखांचे नुकसान

Follow Us:
कोयाळी बु भिसडे येथे अज्ञात इसमाने शेतातील तुरीच्या गंजीला आग लावल्याची घटना
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

वाशिम | ४ फेब्रुवारी २०२६

रिसोड तालुक्यातील कोयाळी (बु.) (भिसडे) येथील शेतकऱ्याच्या शेतात अज्ञात इसमाने तुरीच्या गंजीला आग लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

गजानन सोपान भिसडे यांची गट नंबर १२१, क्षेत्र ३ एकर १५ गुंठे जमीन असून या शेतात तुरीची सोंगणी करून गंजी लावून ठेवण्यात आली होती.

दिनांक ३ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे ३.३० वाजता अज्ञात व्यक्तीने या तुरीच्या गंजीला आग लावली. या आगीत जवळपास २५ पोते तूर जळून खाक झाली असून सुमारे २ ते २.२५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अज्ञात व्यक्तीच्या या कृत्यामुळे हिरावून घेतला गेला असून शेतकरी कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे.

या घटनेची माहिती भिसडे यांनी फोनद्वारे दिली आहे. सदर प्रकरणी रिसोड पोलीस स्टेशनमध्ये अद्याप तक्रार दाखल करण्यात आलेली नव्हती. मात्र, दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ रोजी रिसोडचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांची प्रत्यक्ष भेट घेऊन अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या महसुली परिसरात यापूर्वीही चोरी व आगजनीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र असून, रिसोड पोलीस स्टेशनने या प्रकरणाचा सखोल तपास करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

👉 आपल्या परिसरातील बातम्या Kattanews.in वर पाठवा

📞 संपर्क : 8975013665 | 📧 Email : kattanews@gmail.com

संबंधित बातम्या

 

नारायणराव आरु पाटील

नारायणराव आरू पाटील हे Katta News चे अधिकृत वाशिम जिल्हा प्रतिनिधी आहेत.ते मागील 10 वर्षांपासून स्थानिक व राज्य पत्रकारितेत कार्यरत असून वाशिम जिल्ह्यातील प्रशासन व सामाजिक विषयांवर वार्तांकन करतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मलकापूर पांगरा येथे ट्रॅक्टर अपघातात युवकाचा मृत्यू

मलकापूर पांगरा येथे भीषण अपघात! धावत्या ट्रॅक्टरवरून तोल जाऊन युवक चाकाखाली; मदत मिळण्याआधीच मृत्यू?

सिंदखेडराजा येथे प्रशिक्षणादरम्यान उपाशी राहिलेल्या आशा सेविकांचे आंदोलन

सिंदखेडराजात प्रशासनाचा गोंधळ! प्रशिक्षणात शेकडो आशा सेविका उपाशी; एक सेविका बेशुद्ध पडून हात फ्रॅक्चर

मोताळा येथे क्रेन ऑपरेटरचा संशयास्पद मृत्यू, हातावर लिहिलेला शेवटचा संदेश

मोताळ्यात हृदयद्रावक घटना! क्रेन ऑपरेटरने घेतला टोकाचा निर्णय; हातावर लिहिलेला शेवटचा संदेश वाचून धक्का

Mehkar Nagar Parishad court notice over construction despite ban order

मनाई हुकूम असतानाही बांधकाम; मेहकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व ठाणेदारांना कोर्टाची नोटीस

Mehkar Hotel Ekant police raid sex racket two women rescued

मेहकर बायपासवरील ‘हॉटेल एकांत’मध्ये देहव्यापाराचा पर्दाफाश; पोलिसांच्या छाप्यात दोन महिलांची सुटका

मोहाडी शिवारात बिबट्याचा हल्ला, नीलगाई जखमी

मोहाडी शिवारात बिबट्याचा थरार! नीलगाईवर हल्ला; मादी बिबट्या व दोन पिल्लांचा वावर

Leave a Comment